वनविभाग लावणार ७० हजार झाडे
By admin | Published: June 26, 2017 01:42 AM2017-06-26T01:42:08+5:302017-06-26T01:42:08+5:30
१ जुलै ते ७ जुलै २०१७ दरम्यान पनवेल वन विभाग ७० हजार २१० झाडे लावणार आहे. यात फळझाडे, औषधी झाडांचा समावेश असणार आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : १ जुलै ते ७ जुलै २०१७ दरम्यान पनवेल वन विभाग ७० हजार २१० झाडे लावणार आहे. यात फळझाडे, औषधी झाडांचा समावेश असणार आहे. जांभूळ, आवळा, काजू, करंज, रिठा, बांबू, गुलमोहर आदी प्रकारची झाडे लावण्यात येणार आहेत.
परिसरातील नागरिक, एनजीओ, श्री सदस्य, रोटरी क्लब आदी या वृक्षलागवडीसाठी मदत करणार असल्याची माहिती वनविभागाचे वन क्षेत्रपाल डी. एस. सोनावणे यांनी दिली.
पनवेल येथील बसस्थानक, रेल्वेस्थानक येथे रोपांचे विक्री स्टॉल लावण्यात आले आहेत. पर्यावरण संवर्धनात हातभार लावण्यासाठी, आणि परिसरात वृक्षारोपणासाठी ज्यांना रोपे हवी असतील, त्यांनी पनवेल येथील वन विभागाकडे आधी मागणी केल्यास सवलतीच्या दरात झाडे देणार असल्याची माहिती वन क्षेत्रपाल सोनावणे यांनी दिली.