शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

जमीन बळकावण्यासाठी सातबाराच बदलला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 8:12 AM

बोगस मृत्यू दाखल्याद्वारे स्वत: झाले वारस, ७ जणांवर गुन्हा

नवीन पनवेल : जमीन बळकावण्यासाठी खैरणे ग्रामपंचायत कार्यालयाच्या नावे बोगस मृत्यू दाखला तयार करून सातबारा उताऱ्यावरून नाव कमी करून स्वतःला वारस बनवले. या फसवणूक प्रकरणी सात जणांविरोधात पनवेल तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

बाबू नारायण सिनारे हे सेवानिवृत्त असून, ते डोंबिवली येथे राहतात. त्यांचे वडील नारायण सिनारे यांचे निधन झाले असून, त्यांना गुणीबाई खंडू सिनारे ही बहीण होती. तिचे लग्न देवीचा पाडा येथे राहणारे हशा  फडके यांच्यासोबत झाले होते. कालांतराने हशा फडके हे मयत झाले व गुणीबाई सिनारे यांची सवत हीदेखील मयत झाली. त्यानंतर गुणीबाई सिनारे-फडके या त्यांच्यासोबत डोंबिवली येथे राहण्यास आल्या. २००० मध्ये त्याही मृत पावल्या. त्यावेळी त्यांनी १९९५ रोजी इच्छापत्र लिहून देऊन तिच्या सासरकडील प्रॉपर्टी हे तिच्या मृत्यूनंतर भावाचा मुलगा बाबू नारायण सिनारे यास देण्यात यावी, असे इच्छापत्र केले होते. हशा फडके यांची देवीचा पाडा येथे वडिलोपार्जित जमीन होती, मात्र गुणीबाई सिनारे-फडके यांच्या मृत्यूनंतर सासरच्या माणसांनी तिच्या हिश्शाची जमीन स्वतःच्या नावावर करून घेतल्याचे बाबू सिनारे यांना समजले.

ग्रामपंचायतीकडे नोंदच नाहीमृत्यू दाखल्याची माहिती खैरणे ग्रामपंचायतीकडून घेतली असता कार्यालयाकडून गुणीबाई नथू पाटील या नावाने कोणताही मृत्यू दाखला दिला नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मृत्यू दाखला हा बनावट असल्याचे लक्षात आले. या प्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कशी लागली वारसांची नावे?

२००९ ते २०१० दरम्यानचे गुणीबाई यांच्या नावावर असलेल्या जमिनीचे फेरफार उतारे काढले असता सात-बारा उतारावरून गुणीबाई सिनारे-फडके यांचे नाव कमी करून ठमूबाई रामा फडके, ताईबाई रामा फडके, महादेव रामा फडके, ज्ञानदेव रामा फडके, इंद्रा ऊर्फ इंदिरा रामा पाटील, मीना नाना पाटील, पुष्पा जयवंत भोईर यांनी त्यांची नावे वारस म्हणून लावल्याचे समोर आले.

 ही नावे वारस म्हणून कशी लागली याची माहिती अधिकाऱ्यांन्वये कागदपत्रे प्राप्त केली. यावेळी गुणीबाई नथू पाटील या नावाने खैरणे ग्रामपंचायतमधून प्राप्त केलेल्या मृत्यू दाखल्याचा वापर करून सात-बारावर त्यांची नावे लावल्याचे समोर आले. गुणीबाई यांचा मृत्यू डोंबिवली येथे झाल्याने मूळ मृत्यू दाखला बाबूराव सिनारे यांच्याकडे आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरीpanvelपनवेल