धरणाचे काम न करताच ७३ लाखांचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 03:00 AM2018-03-13T03:00:26+5:302018-03-13T03:00:26+5:30
चणेरा लघु पाटबंधारे (म्हसेवडी धरण) योजनेतील काम सुरू न होताच तब्बल ७३ लाख रुपये खर्च झाल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. त्यामुळे या धरणासाठी नेमका कुठे आणि कसा खर्च करण्यात आला असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.
पनवेल : चणेरा लघु पाटबंधारे (म्हसेवडी धरण) योजनेतील काम सुरू न होताच तब्बल ७३ लाख रुपये खर्च झाल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. त्यामुळे या धरणासाठी नेमका कुठे आणि कसा खर्च करण्यात आला असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे. याबाबत पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांना निवेदन दिल्याची माहिती प्रकाश विचारे यांनी दिली.
रोहा तालुक्यातील चणेरा लघु पाटबंधारे योजना २ फेब्रुवारी १९८१ रोजी मंजूर झाली. त्यावेळी तिचा खर्च ५९२.४९ लाख इतका होता. दुसºयांदा योजनेला ९ जून १९९४ मध्ये मंजुरी देण्यात आली. त्यावेळी त्याचा खर्च २८७०.२६ लाख होता. त्यानंतर २०११ मध्ये तिसºयांदा मान्यता दिली त्यावेळी त्याचा खर्च ३२६३.७७ लाख दाखवण्यात आला आहे. यामध्ये ११२३० मीटर लांबीचे २० मीटर उंचीचे मातीचे धरण बांधवायचे आहे. त्यामध्ये ५१४९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा राहणार आहे. त्याचा २५० हेक्टर क्षेत्राला लाभ मिळणार आहे. माजी पालकमंत्री सुनील तटकरे यांनी काम सुरू करण्यासाठी तत्कालीन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते २०११ मध्ये भूमिपूजनही केले. या प्रकल्पावर जानेवारी २०१८ पर्यंत ७३.०९ लाख खर्च झाल्याची माहिती देण्यात आली, पण कामाला अद्याप सुरु वात झाली नाही, असे सांगण्यात आले आहे. धरणाचा कामाचा ठेका एफ. ए. कन्स्ट्रक्शनला देण्यात आला होता. एसीबीच्या तपासात हे धरण सापडल्याने त्याचे काम थांबवण्यात आले आहे.
>धरणाचे काम थांबले
एसीबीच्या तपासात हे धरण सापडल्याने त्याचे काम थांबवण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर धरणाचे काम दुसºयाला देण्यास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. चणेरेकरांना आणखी काही वर्षे धरणाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.