७४३ भूखंडांची सोडत

By admin | Published: August 15, 2015 10:48 PM2015-08-15T22:48:02+5:302015-08-15T22:48:02+5:30

तरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाकरिता संपादित करण्यात येणाऱ्या गावठाणामधील आणि गावठाणाबाहेरील बांधकामाच्या मोबदल्यात देण्यात येणाऱ्या भूखंडांची सहावी

743 Leasing of Plots | ७४३ भूखंडांची सोडत

७४३ भूखंडांची सोडत

Next

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाकरिता संपादित करण्यात येणाऱ्या गावठाणामधील आणि गावठाणाबाहेरील बांधकामाच्या मोबदल्यात देण्यात येणाऱ्या भूखंडांची सहावी संगणकीय सोडत आज काढण्यात आली. या सोडतीद्वारे कोल्ही, कोपर, वाघिवली वाडा, वरचे ओवळे, उलवे, तरघर, कोंबडभुजे, गणेशपुरी व वाघिवली गावांतील ७४३ बांधकामधारकांच्या भूखंडांचे क्रमांक निश्चित करण्यात आले. या सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टच्या माध्यमातून सिडकोच्या संकेतस्थळवरून करण्यात आले.
या सोडतीस पर्यवेक्षण समितीचे सदस्य म्हणून निवृत्त न्यायाधीश एम. एन. कुलकर्णी, भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी व्ही. एस. धोंगडे, महावितरणचे उपमहाव्यवस्थापक (मा.तं.) जयप्रकाश सोनी, पत्रकार मनोज जालनावाला आणि सिडकोचे माजी मुख्य अभियंता के. वाय. जोशी यांनी उपस्थिती दर्शविली.
सोडतीमध्ये प्रकल्पग्रस्तांना भूखंड वाटप करताना बांधकामधारकाचे नाव, बांधकामधारकाची पात्रता आणि उपलब्ध भूखंडांची संख्या या गोष्टींचा विचार करण्यात आला. पुनर्वसन व पुन:स्थापना योजनेअंतर्गत पात्र प्रकल्पग्रस्तांसाठी उलवे नोडमधील वहाळ येथे भूखंड विकसित करण्यात येत आहेत. एकूण १६७ ब्लॉक्सपैकी कोल्ही गावासाठी १० ब्लॉक्स, कोपरगावासाठी २५ ब्लॉक्स, वाघिवाली वाडा गावासाठी १३ ब्लॉक्स, वरचे ओवळे गावासाठी १५ ब्लॉक्स, उलवे गावासाठी २८ ब्लॉक्स, तरघर गावासाठी १४ ब्लॉक्स, कोंबडभुजे गावासाठी २७ ब्लॉक्स, गणेशपुरी गावासाठी १९ ब्लॉक्स आणि वाघिवली गावासाठी १६ ब्लॉक्स तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक ब्लॉकमध्ये ठरावीक क्षेत्रफळाचे भूखंड आहेत. सोडतीतील निर्णयानुसार ब्लॉकमधील भूखंड क्रमांक निश्चित करण्यात
आले.
सोडतीनंतर संपूर्ण निकालाचा तपशील सिडकोच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे निकालाची प्रत सिडकोच्या सूचना फलकावरदेखील प्रदर्शित करण्यात आली आहे. सोडतीमधील भूखंडाचे वाटप भूसंपादनाचा निवाडा जाहीर केल्यानंतर होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 743 Leasing of Plots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.