संजय गायकवाड, कर्जतकर्जत तालुक्यातील अनेक गाव-पाडे टंचाईग्रस्त आहेत. प्रशासनाने तयार केलेल्या संभाव्य पाणीटंचाई आराखड्यामध्ये तब्बल ३४ गावे आणि ४१ आदिवासीवाड्यामध्ये पाणीटंचाई आहे. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन काही दिवसांनी टँकर सुरू करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाला करावे लागणार आहे.कर्जत तालुक्यातील प्रामुख्याने एप्रिल आणि मे महिन्यात आदिवासी आणि दुर्गम भागात निर्माण होणारी पाणीटंचाईची स्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावांचा आराखडा तयार केला आहे. तो आराखडा तयार करताना तालुक्यात गावपातळीवर सुरू असलेल्या नळपाणी योजना यांची कामे, जलसंधारणअंतर्गत सुरू असलेली कामे यांचा विचार करण्यात आला. तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांची नावे निश्चित करून तेथे टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.संभाव्य पाणीटंचाईग्रस्त वाड्यामध्ये (टाकाची वाडी-दामत), खांडसवाडी, वेणगाव कातकरवाडी, भडवळ कातकरवाडी, डोणेवाडी, नवसूची वाडी, जांभूळवाडी (वारे), हाऱ्याची वाडी (वारे), देऊळवाडी, कोळ्याची वाडी, दोरेवाडी (कशेळे), कातकरवाडी (कशेळे), चिमटेवाडी (नांदगाव), भोपळेवाडी (नांदगाव), चौधरवाडी, आनंदवाडी-मोग्रज, वाघ्याची वाडी (बेडीसगाव), कोतेरीवाडी (बेडीसगाव), चोरीची वाडी (बेडीसगाव), शाळेची वाडी (बेडीसगाव), कुंडवाडी-बेडीसगाव, तिवरे-बौध्दवाडी, माले-कातकरवाडी, पोटल मुस्लीम वस्ती, आधाकवाडी (शेलू), बौध्दवाडा (शेलू, कळंब-सुतारपाडा,) गरुडपाडा, बीड कातकरवाडी, मोहिली कातकरवाडी, बेकरेवाडी, सराईवाडी, वरईवाडी (मानिवली), सालवाडी, भालीवडी, जांभूळवाडी (मोग्रज), मल्याची वाडी, मिरचूलवाडी (कळंब), बोरीची वाडी (कळंब), ताडवाडी, मोरेवाडी, वर्णे ठाकूरवाडी, पळसदरी-ठाकूरवाडी येथे पाणीटंचाईसदृश परिस्थिती असून, तेथे पाणीटंचाई दूर करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे.> कळंब (गावठाण), कुंडलज, जांभिवली, अंथ्राट वरेडी, बोरगाव, ओलमण, मुळगाव, खांडपे, कोंदिवडे, बीड, नेवाळी, लाडीवली, तिवणे(वासरे), दहिगाव, वरई, आडिवली, आर्ढे, पाली गाव, आंबोट, पोटल, किरवली, सालपे, कडाव, सावळा, हेदवली, गुडवण, किकवी, आषाणे, कोषाणे, मोग्रज, माणगाव (खांडपे), पोसरी, तिवरे ही गावे संभाव्य पाणीटंचाईग्रस्त आहेत. याठिकाणी टँकरने अधूनमधून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र बहुतांश पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते. याशिवाय बोअरवेलसाठीही काही गावांत प्रयत्न सुरू आहेत.
कर्जतमधील ७५ गाव-पाडे टंचाईग्रस्त
By admin | Published: April 04, 2016 2:10 AM