सिडकोची शिल्लक ७६ घरे विक्रीसाठी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 02:56 AM2019-11-29T02:56:01+5:302019-11-29T02:56:28+5:30

दहा हजार घरांची यशस्वी सोडत काढल्यानंतर सिडकोने आता जुन्या गृहप्रकल्पातील शिल्लक राहिलेली आणखी ७६ घरे विक्रीसाठी काढली आहेत.

76 house of Cidco for sale | सिडकोची शिल्लक ७६ घरे विक्रीसाठी

सिडकोची शिल्लक ७६ घरे विक्रीसाठी

Next

नवी मुंबई  - दहा हजार घरांची यशस्वी सोडत काढल्यानंतर सिडकोने आता जुन्या गृहप्रकल्पातील शिल्लक राहिलेली आणखी ७६ घरे विक्रीसाठी काढली आहेत. यात वास्तुविहार सेलिब्रेशन आणि उन्नत्ती या गृहप्रकल्पातील शिल्लक घरांचा समावेश आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या गुरूवारी या घरांच्या नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला.

मागेल त्याला घर या धोरणांनुसार सिडकोने येत्या काळात सुमारे दोन लाख घरे बांधण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतला आहे. त्यापैकी ९ हजार घरांच्या प्रकल्पाचा शुभारंभही करण्यात आला आहे. नवीन घरे बांधतानाच जुन्या शिल्लक राहिलेल्या घरांचा निपटारा करण्यावर सिडकोने भर दिला आहे. सिडकोने आगामी काळात विविध आर्थिक घटकांसाठी जवळपास दोन लाख घरे बांधण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

त्यातील ९५ हजार घरांच्या महत्वकांक्षी योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. त्यापैकी पहिल्या टप्यातील ९२४९ घरांच्या विक्रीसाठी सप्टेंबर २0१९ मध्ये आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्याचबरोबर स्वप्नपूर्ती या जुन्या गृहप्रकल्पातील शिल्लक ८१0 घरांसाठी सुध्दा अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज सादर करण्यासाठी ५ नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. या दोन्ही गृहप्रकल्पातील दहा हजार घरांसाठी जवळपास एक लाख अर्ज सिडकोला प्राप्त झाले होते. त्याची संगणकीय सोडत मंगळवारी काढण्यात आली. त्यानंतर लगेच वास्तुविहार सेलिब्रेशन आणि उन्नत्ती गृहप्रकल्पातील ७६ सदनिकांची गुरूवारपासून आॅनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

घरांची नोंदणी आणि सोडत आॅनलाईन पध्दतीने होत असल्याने त्यात पारदर्शकता आली आहे. या आॅनलाईन प्रणालीचे राज्य सरकारने सुध्दा प्रशंसा केल्याची माहिती लोकेश चंद्र यांनी यावेळी दिली. तसेच नवी मुंबईत घर घेवू इच्छीणाऱ्यांना येत्या काळ घर घेण्याच्या अनेक संधी उपलब्ध होणार असल्याचे सुध्दा त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या प्रसंगी सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रशांत नारनवरे, सहव्यवस्थापकीय संचालक अशोक शिनगारे व संबधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

७६ सदनिकांचा तपशील
नोंदणीसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या ७६ सदनिकांपैकी वास्तुविहार सेलिब्रेशन गृहप्रकल्पात ४५ तर उन्नत्ती गृहप्रकल्पातील ३१ घरे आहेत. वास्तुविहार सेलिब्रेशन गृहप्रकल्पात वन रूम किचन, वन बीएचके आणि टू बिएचके तर उन्नती गृहप्रकल्पात १ आरके व १ बीएचके घरांचा समावेश आहे. वास्तुविहार सेलिब्रेशन हा गृहप्रकल्प खारघरच्या निसर्गरम्य परिसरात तर उन्नती गृहप्रकल्प नव्याने विकसीत होत असलेल्या उलवे नोडमध्ये आहे.

Web Title: 76 house of Cidco for sale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.