७७ ,१९६ हजार कोटी खर्चाच्या वाढवण बंदराच्या उभारण्याच्या कामाला पर्यावरण विभागाकडून हिरवा कंदील

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 09:50 AM2023-08-03T09:50:34+5:302023-08-03T09:51:44+5:30

जेएनपीएने २०२० पासुन पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराच्या कामाला सुरुवात केली आहे.

77,196 thousand crore cost increase, green light from the environment department for the construction of the port | ७७ ,१९६ हजार कोटी खर्चाच्या वाढवण बंदराच्या उभारण्याच्या कामाला पर्यावरण विभागाकडून हिरवा कंदील

७७ ,१९६ हजार कोटी खर्चाच्या वाढवण बंदराच्या उभारण्याच्या कामाला पर्यावरण विभागाकडून हिरवा कंदील

googlenewsNext

मधुकर ठाकूर

उरण : जागतिक स्तरावरील सर्वात मोठे आणि जेएनपीए अंतर्गत उभारण्यात येत असलेल्या सुमारे ७७,१९६ हजार कोटी खर्चाच्या वाढवण बंदराच्या कामाला डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाने ३१ जुलै २०२३ रोजी नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे.स्थानिक मच्छीमारांच्या जोरदार विरोधानंतरही पर्यावरण विभागाकडून हिरवा कंदील मिळाल्याने रखडत रखडत सुरू असलेल्या व वर्षाकाठी २ कोटी ३० लाख कंटेनर क्षमतेचे वाढवण मेगा पोर्ट उभारण्याच्या कामाला चालना मिळणार आहे.

 जेएनपीएने २०२० पासुन पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराच्या कामाला सुरुवात केली आहे. समुद्रात नैसर्गिक खोली लाभलेल्या या उभारण्यात येणाऱ्या जागतिक स्तरावरील सर्वात मोठ्या वाढवण बंदराची कंटेनर हाताळणीची क्षमता वर्षाकाठी २ कोटी ३० लाख इतकी प्रचंड आहे.७७,१९६ हजार कोटी खर्चाच्या हे मेगा पोर्ट दोन टप्प्यांत उभारण्यात येणार आहे.दोन टप्प्यात हे मेगा पोर्ट उभारण्यात येणार आहे.पहिल्या टप्प्यातील होणाऱ्या विकासकामांसाठी जेएनपीए ४४ हजार कोटी खर्च करणार आहे.तर दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी ३३ हजार कोटी रुपये प्रायव्हेट सेक्टरमधुन खर्च केला जाणार आहे.या एकूण ७७.१९६ हजार कोटी खर्चाच्या कामामध्ये बंदराकडे जाणारे स्वतंत्र रस्ते तयार करणे,ब्रेकवॉटर, ड्रेजिंग, रिक्लेमेशन, भूसंपादन, रेल्वे मार्गाची निर्मिती करणे, वीजपुरवठा व्यवस्था, बंधाऱ्यांची निर्मिती, पाणी पुरवठा,कार्गो बर्थ उभारणी आदी कामांचा समावेश असल्याचे जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी यांनी सांगितले.

  जागतिक स्तरावरील सर्वात मोठ्या वाढवण मेगा पोर्ट उभारण्यास येथील स्थानिक मच्छीमारांचा कडवा विरोध आहे.सीआरझेड ,केंद्रीय मंत्रालयाकडून ना-हरकत प्रमाणपत्र आणि पर्यावरण विभागाकडून विविध मंजुरी मिळवण्यासाठी होणाऱ्या विलंबामुळे 
 मागील चार वर्षांपासून या वाढवण बंदराचे काम रखडत रखडत सुरू आहे.

  जेएनपीएला डहाणू तालुक्यातील वाढवण येथे या वाढवण बंदराची स्थापना आणि विकास करण्याची ३१ जुलै २०२३ रोजी डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाने (DTEPA) परवानगी दिली आहे.या परवानगीच्या आधारावर आता केंद सरकारच्या पर्यावरण विभागाकडे विविध प्रकारच्या आवश्यक परवानगीच्या मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे जेएनपीएने सांगितले.  

डहाणू तालुक्यात वाढवण बंदराची स्थापना आणि विकास करण्यास विविध अटी व शर्तींच्या अधीन राहून डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाने परवानगी दिली आहे. ७७,१९६ कोटी रुपयांच्या खर्चाच्या व गुंतवणुकीसह उभारण्यात येत असलेल्या अत्याधुनिक बंदरातुन प्रतिवर्षी सुमारे ३०० मिलियन टन कंटेनर मालाची वाहतूक होणार आहे. ३०० मिलियन टन क्षमतेचे वाढवण बंदर हे जगातील सर्वात मोठे कंटेनर बंदर ठरणार आहे.
-संजय सेठी,
अध्यक्ष - जेएनपीए.

Web Title: 77,196 thousand crore cost increase, green light from the environment department for the construction of the port

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.