पनवेल मध्ये 78 किलो वजनाचे प्लास्टिक पिशव्या जप्त

By वैभव गायकर | Published: September 1, 2023 06:37 PM2023-09-01T18:37:34+5:302023-09-01T18:37:43+5:30

वैभव गायकर  पनवेल:पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती क कामोठे व नवीन पनवेल, पनवेल विभागामध्ये दि.1 रोजी प्लास्टिक बंदी विरोधी जप्तीची ...

78 kg plastic bags seized in Panvel | पनवेल मध्ये 78 किलो वजनाचे प्लास्टिक पिशव्या जप्त

पनवेल मध्ये 78 किलो वजनाचे प्लास्टिक पिशव्या जप्त

googlenewsNext

वैभव गायकर 

पनवेल:पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती क कामोठे व नवीन पनवेल, पनवेल विभागामध्ये दि.1 रोजी प्लास्टिक बंदी विरोधी जप्तीची कारवाई करण्यात आली. यावेळी एकुण 78 किलो वजनाचे प्लास्टिक चमचे ,प्लास्टिक डबे, कॅरीबॅग जप्त करण्यात आले.    

 प्लास्टिक जप्ती कारवाईवेळी  प्रभाग क कामोठेमध्ये सुमारे 70 किलो प्लास्टिक पिशवी, ग्लास, आणि कंटेनर जप्त करून पहिला गुन्हा नोंदवून  15 हजार रुपये दंड वसुल करण्यात आला. आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड आणि  महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी शिवानंद बासमते  यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये ही कारवाई करण्यात आली.

तसेच  नवीन पनवेल, पनवेल विभागामध्ये कारवाई दरम्यान  एकूण 20 हजार दंड वसुल  करण्यात आला. या ठिकाणावरून सुमारे 8 किलो वजनाचे प्लास्टिक चमचे, प्लास्टिक डबे, कॅरीबॅग जप्त करण्यात आले. सदर ठिकाणी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी  शशिकांत लोखंडे ,मुख्य आरोग्य निरीक्षक श शैलेश गायकवाड साहेब, प्रभाग अधिकारी रोशन माळी , स्वच्छता निरीक्षक अभिजीत भवर,  महेंद्र भोईर , अनिकेत जाधव, जयेश कांबळे, ऋषिकेश गायकवाड, अतुल वास्कर योगेश कस्तुरे, व कर्मचारी उपस्थित होते.  चौकट  एकल  प्लास्टिकचा वापर मार्च 2018 पासूनच प्रतिबंधित आहेत.

यामध्ये सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या (कॅरी बॅग्स) - हॅडल असलेल्या व नसलेल्या कंपोस्टेबल व प्लास्टिक ( कचरा व नर्सरीसाठीच्या पिशव्या सोडून) सर्व प्रकारच्या नॉन ओव्हन पॉलीप्रोपीलीन बॅग्स  ६० ग्रॅम पर स्क्वेअर मीटर (जीएसएम) पेक्षा कमी जाडीच्या पिशव्या यावरती बंदी असणार आहे.

Web Title: 78 kg plastic bags seized in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.