शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

१५ व्या वित्त आयोगाचे राज्याच्या २१ शहरांना ७९९ कोटी

By नारायण जाधव | Published: October 31, 2022 6:26 PM

राज्यातील मिलेनियम प्लस २१ शहरांना १५ व्या वित्त आयोगांतर्गत पाणीपुरवठा आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी २०२१-२२ या वर्षासाठीचे ७९९ कोटींचे भरीव अनुदान नगरविकास विभागाने वितरीत केले आहे.

नवी मुंबई :

राज्यातील मिलेनियम प्लस २१ शहरांना १५ व्या वित्त आयोगांतर्गत पाणीपुरवठा आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी २०२१-२२ या वर्षासाठीचे ७९९ कोटींचे भरीव अनुदान नगरविकास विभागाने वितरीत केले आहे. यात मुंबई महानगर प्रदेशातील ९ शहरांच्या वाट्याला ५२३ कोटी आले असून एकट्या मुंबई महापालिकेस ३२२ कोटी रुपये मिळाले आहेत.

ठाण्यास ५० कोटी तर नवी मुंबईला ३२ कोटीनगरविकास विभागाने २५ ऑक्टोबर रोजी २१ शहरांना जे ७९९ कोटी रुपये वितरीत केले आहेत, त्यात मुंबई महापालिकेला ३२२ कोटी १९ लाख ८६ हजार ५७२ रुपये, नवी मुंबई महापालिकेस ३२ कोटी १७ लाख ३० हजार ७२८ रुपये, ठाणे महापालिकेस ४९ कोटी ९० लाख ८१ हजार १५१ रुपये, कल्याण-डोंबिवली महापालिकेस ३५ कोटी ६० लाख ६६ हजार ७४६ रुपये, मीरा-भाईंदर महापालिकेस २३ कोटी ४१ लाख ३९ हजार २७६ रुपये, उल्हासनगरला १२ कोटी ८० लाख एक हजार २२७ रुपये, अंबरनाथ नगरपालिका सात कोटी ८५ लाख ४५ हजार ५२० रुपये, बदलापूर नगरपालिकेस पाच कोटी ९४ लाख ४८ हजार ७८० तर वसई-विरार महापालिकेस ३३ कोटी रुपये दिले आहेत.

स्वच्छ भारतची रँकिंग वाढणारया निधीतून या शहरांना आपापल्या हद्दीतील पाणीटंचाई असलेल्या परिसरातील पाणीपुरवठा योजना राबविता येणार आहेत. यामुळे अनेक शहरांतील पाणीपुरवठ्यातील त्रुटी दूर होऊन मुबलक पाणी मिळून तेथील स्थानिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

स्वच्छ भारत अभियानात महत्त्वाचा घटक असलेल्या घनकचरा व्यवस्थापनातील त्रुटी दूर करून क्षेपणभूमी, कचऱ्यापासून खतनिर्मिती, वीजनिर्मिती, घनकचऱ्यापासून विटा बनविणे यासारखे प्रकल्प राबविता येणार आहेत. यातून या शहरांतील रस्तोरस्ती दिसणारे कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी दूर होऊनदेशातील स्वच्छ भारत अभियानातील त्यांची रँकिंग वाढण्यासही मदत होणार आहे.