दुषीत पाणी पिल्याने तळोजात ८ बकऱ्यांचा मृत्यू; पनवेल तळोजामधील घटना

By वैभव गायकर | Published: August 6, 2023 09:27 AM2023-08-06T09:27:28+5:302023-08-06T09:27:40+5:30

नावडे येथील बुधा अनंता म्हात्रे या शेतकऱ्याचे या बकऱ्या आहेत. तळोजा मधील प्रदूषण चिंतेची बाब आहे.

8 goats die in Taloja after drinking contaminated water; Incident in Panvel Taloja | दुषीत पाणी पिल्याने तळोजात ८ बकऱ्यांचा मृत्यू; पनवेल तळोजामधील घटना

दुषीत पाणी पिल्याने तळोजात ८ बकऱ्यांचा मृत्यू; पनवेल तळोजामधील घटना

googlenewsNext

पनवेल: तळोजा एमआयडीसीमधून वाहणारी कासाडी नदीमधील रासायनिक केमिकल मिश्रित पाणी पिल्याने आठ बकऱ्या मृत्युमुखी पावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नावडे येथील बुधा अनंता म्हात्रे या शेतकऱ्याचे या बकऱ्या आहेत. तळोजा मधील प्रदूषण चिंतेची बाब आहे. प्रदूषणावरून स्थानिक माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी राष्ट्रीय हरित लवादामध्ये याचिका दाखल केली आहे.येथील प्रदूषण रोखण्यास अधिकारी तसेच तलोजा एमआयडीसीपनवेल महानगरपालिका जनतेच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला आहे.केमिकल मिश्रित पाणी नदीत  सोडल्यामुळे अनेक वर्षांपासून पारंपरिक  गणपती विसर्जनाला देखील अडथळे येत आहेत.

Web Title: 8 goats die in Taloja after drinking contaminated water; Incident in Panvel Taloja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.