शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
14
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
15
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
16
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
17
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
18
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
19
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
20
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!

८०० कोटींची जमीन झाली अतिक्रमणमुक्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2016 2:43 AM

सिडकोने बेकायदा बांधकामांच्या विरोधात कंबर कसली आहे. याअंतर्गत मागील दीड वर्षात जवळपास ९५ हजार चौरस मीटर जागा अतिक्रमणमुक्त करण्यात आली आहे

कमलाकर कांबळे,  नवी मुंबई सिडकोने बेकायदा बांधकामांच्या विरोधात कंबर कसली आहे. याअंतर्गत मागील दीड वर्षात जवळपास ९५ हजार चौरस मीटर जागा अतिक्रमणमुक्त करण्यात आली आहे. सध्याच्या बाजारभावाप्रमाणे या जागेची किंमत ८०० कोटींच्या घरात आहे. त्यामुळे सिडकोचे मनोबल उंचावले असून, येत्या काळात अतिक्रमणांच्या विरोधातील कारवाई अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.नवी मुंबईतील बहुतांशी जमिनीची मालकी सिडकोकडे आहे. असे असले तरी गेल्या काही वर्षांत सिडकोच्या दुर्लक्षपणामुळे या जमिनी भूमाफियांनी गिळंकृत केल्या आहेत. सिडकोच्या या जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. मागील दीड दशकात या अतिक्रमणांना आळा घालण्यात सिडको सपशेल अपयशी ठरली आहे. असे असले तरी गेल्या दीड-दोन वर्षांपासून सिडकोने अतिक्रमणांच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. गेल्या वर्षात तर ही मोहीम अधिक व्यापक करण्यात आली. त्यामुळे जून २0१५ नंतर आतापर्यंत नवी मुंबईसह उरण आणि पनवेल तालुक्यातील बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करून तब्बल ६४ हजार २0७ चौरस मीटर म्हणजेच १६ एकर जमीन अतिक्रमणमुक्त करण्यात आली. त्याअगोदर म्हणजेच २0१४ मध्ये एकूण ३१ हजार ३४५ चौरस मीटर जागेवरील अतिक्रमण हटवून ती ताब्यात घेतली आहे. सध्याच्या मार्केट दरानुसार या संपूर्ण जागेची किंमत ८०० कोटी रुपयांच्या घरात आहे. सिडकोच्या मालकीच्या आणखी शेकडो एकर जमिनीवर बेकायदा बांधकामे उभारली आहेत. टप्प्याटप्प्याने ही सर्व बांधकामे जमीनदोस्त करून अतिक्रमित जागा ताब्यात घेण्याची योजना सिडकोने आखली आहे. त्यामुळे येत्या काळात ही मोहीम तीव्र होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.