- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : सायबर सिटी म्हणून परिचित असलेली नवी मुंबई एचआयव्हीच्या विळख्यात सापडली आहे. सद्यस्थितीला महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे दहा हजार एचआयव्ही बाधितांची नोंद असून, त्यापैकी दोन हजार रुग्ण महापालिका क्षेत्राबाहेरचे आहेत, तर दहा वर्षांच्या तुलनेत प्रतिवर्षी एचआयव्ही रुग्णांच्या संख्येत प्रतिवर्षी घट होत आहे. मात्र, जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने ‘लोकमत’ने घेतलेल्या आढाव्यात शहरात अद्यापही जनजागृतीचा अभाव असल्याचे दिसून येत आहे.राज्यात १९८६ साली मुंबईत एचआयव्ही बाधित एड्सचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर त्याचे गांभीर्य समोर आले होते. अनेक संशोधने होऊनही एड्स पूर्णपणे बरा होईल, अशी उपचार पद्धत अद्याप संशोधनात हाती लागलेली नाही. त्यामुळे एड्सच्या संसर्गाचा वेग आणि प्रसार कसा कमी करता येईल, यावर आरोग्य विभागाने भर दिला. त्यानुसार संपूर्ण राज्यभर एड्स बाबत जनजागृती मोहिमेला सुरुवात झाली व ती आजही राबवली जात आहे. यानंतरही एड्स रुग्णांच्या संख्येत अपेक्षित अशी घट झालेली नसल्याचे दिसत आहे. सद्यस्थितीला दहा हजार एचआयव्ही बाधित रुग्णांची नोंद नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे आहे. त्यापैकी सुमारे आठ हजार रुग्ण महापालिका क्षेत्रातले असून, उर्वरित महापालिका क्षेत्राबाहेरील आहेत. वाशीतील महापालिका रुग्णालयात त्यांच्यावर नियमित उपचार होत असून, दररोज शंभरहून अधिक रुग्णांवर उपचार होत आहेत. याशिवाय त्यांचे समुपदेशनही केले जाते.विशेष म्हणजे, उपचार घेणाºयांमध्ये १५०० अशी दाम्पत्ये आहेत की, ज्यांत पती किंवा पत्नी एचआयव्ही बाधित आहेत. त्यांना एका जोडीदारापासून दुसºयाला बाधा होणार नाही, याची खबरदारी घेतली जाते. त्याशिवाय एचआयव्ही बाधित गरोदर महिलेपासून तिच्या बालकाला लागण होऊ नये याकरिता औषध उपचार केले जातात. मागील तीन वर्षांत एकही नवजात बालकामध्ये एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळलेला नाही. संशयितांच्या रक्ताची चाचणी करून घेण्यासाठी महापालिका क्षेत्रात सहा ठिकाणी चाचणी केंद्र चालवली जात आहेत. या चाचणीमध्ये एखादी व्यक्ती एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळल्यास त्याच्यावर तत्काळ उपचाराला सुरुवात केली जाते. तर जे प्रतिसाद देत नाहीत, त्यांच्याशी संपर्क साधून समुपदेशन केले जाते.एड्स हा वेश्यांपुरता मर्यादित राहिलेला नसून स्थलांतरितांचाही त्यात समावेश आहे. नवी मुंबईत आशिया खंडातली मोठी बाजारपेठ व औद्योगिक पट्टा आहे. तिथले बहुतांश कामगार विविध राज्यांतून स्थलांतरित झालेले आहेत. त्यांच्यासह लांबच्या पल्ल्यावर ट्रकचालकाचे काम करणारे सेक्स वर्कर महिलांच्या आहारी जाताना पुरेशी खबरदारी घेत नसल्याने एचआयव्हीची लागण होत आहे.शून्य अजून गाठायचा आहे...पालिकेसह समाजसेवी संस्थांकडून पथनाट्यासह, जाहिराती व पत्रकांद्वारे नागरिकांमध्ये एड्सबाबत जनजागृती केली जाते, तर एचआयव्ही बाधितांचे समुपदेशन करून त्यांना उपचारासाठी मार्गदर्शन केले जाते. मात्र, यानंतरही ३० टक्केहून अधिक रुग्ण उपचाराकडे पाठ फिरवत आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या नियंत्रित करण्यात अद्याप अपेक्षित यश आलेले नाही.शहरातील एकूण एड्स रुग्णांमध्ये वेश्याव्यवसाय करणाºया ५० महिला, ४ तृतीयपंथी व ५४ समलिंगी पुरुषांचाही समावेश आहे. शहरातील बहुतांश लॉज, हॉटेल यांच्यासह मॅफ्को मार्केट, एपीएमसी ट्रक टर्मिनस, सानपाडा ते वाशी मार्गावर अवैध वेश्याव्यवसाय चालतो. त्याशिवाय शहरातील सर्वात मोठा वेश्याव्यवसाय तुर्भे स्टोअर येथे चालतो. अशा ठिकाणी चालणाºया अनैतिक धंद्यामुळे अनेकांना एचआयव्हीची लागण होत आहे.प्रतिबंधात्मक साधनांचा अभावएचआयव्हीचा प्रसार थांबविण्यासाठी काही वर्षांपूर्वी शासकीय रुग्णालये, सार्वजनिक शौचालयांमध्ये एक रुपयात निरोध उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र, मागील तीन ते चार वर्षांपासून ही मोहीम ठप्प झाल्याचे पाहायला मिळत आहे. परिणामी, ज्या ठिकाणी निरोधची मागणी जास्त आहे, अशा थिएटर व ट्रक टर्मिनस, वेश्या व्यवसायाच्या ठिकाणी यालगतच्या टपºयांवर जास्त दराने त्याची विक्री केली जात आहे. तर एड्स नियंत्रण केंद्रात ते उपलब्ध असतानाही लाजेखातर गरजू त्याकडे पाठ फिरवत आहेत.एचआयव्हीबाधित रुग्णांची संख्या प्रतिवर्षी घटत चालली आहे. त्यांच्या वेळोवेळी चाचण्या करून औषधोपचार केले जात आहेत. त्याशिवाय गरोदर महिलांपासून त्यांच्या नवजात बालकाला लागण होऊ नये याचीही खबरदारी घेतली जाते. तर जे रुग्ण उपचारासाठी प्रतिसाद देत नाहीत, त्यांचे समुपदेशन करून एचआयव्ही रुग्णांची संख्या शून्य करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.- डॉ. सविता दारूवाला,विभागीय अधिकारी.दहा हजार रुग्णांसाठी एकमेव डॉक्टरमहापालिकेच्या रुग्णालयात सध्या शहरातील व शहराबाहेरील दहा हजार एचआयव्ही बाधित उपचार घेत आहेत. त्यानुसार दररोज शंभरहून अधिक रुग्णांवर उपचार केले जात आहेत. मात्र, उपचारासाठी डॉ. सदानंद वाघचौरे हे एकमेव डॉक्टर व अपुरे कर्मचारी आहेत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असून, उपलब्ध कर्मचा-यांवर कामाचा ताण पडत आहे.
एचआयव्हीचे शहरात आठ हजार रूग्ण, सायबर सिटीही एड्सच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 7:32 AM