शहरात ८१० चालकांचे परवाने निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 11:16 PM2019-03-02T23:16:44+5:302019-03-02T23:16:57+5:30
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचा चालकपरवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याची मोहीम आरटीओने सुरू केली आहे.
नवी मुंबई : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचा चालकपरवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याची मोहीम आरटीओने सुरू केली आहे. १४७२ चालकपरवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव पाठविला होता. त्यापैकी ८१० परवाने निलंबित केले आहेत.
नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागाचे प्रमुख अधिकारी दशरथ वाघुले यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी विशेष मोहीम राबवून वाहतूक नियमांना फाटा देणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली जात आहे. १ नोव्हेंबर २०१८ ते २७ फेब्रुवारी २०१९ या तीन महिन्यांच्या कालावधीत नवी मुंबई वाहतूक शाखेकडून विविध गुन्ह्यांतील एकूण १४७२ चालकांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले, त्यापैकी वाशी येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी कारवाई करून चक्क ८१० बेशिस्त वाहनचालकांचे परवानेच निलंबित केले आहेत.
अनेक वाहनचालक वाहतुकीच्या या नियमांकडे दुर्लक्ष करीत असल्याने हा प्रकार एखाद्या मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारा ठरतो. ओव्हरलोड वाहतूक, मद्यपान करून वाहन चालविल्यामुळेही अपघात होत असतात. नियमांचे उल्लंघन करणाºयांविरोधात कडक कारवाई सुरू केल्यामुळे बेशिस्तपणे वाहन चालविणाºयांचे धाबे दणाणले आहेत.
यापूर्वी नवी मुंबईप्रमाणे पनवेलमध्येही अपघात कमी होण्याच्या दृष्टीने मोहीम राबविली जात असून, नियम मोडणाºया चालकांवर कारवाई करण्यात येत आहे.