शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

विकासगडावर ८४ कोटींच्या महसुलाचे ओझे

By admin | Published: January 06, 2016 1:12 AM

रायगड जिल्ह्याला २१२ कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट गाठायचे आहे. जिल्ह्यात मोठ्या संख्येने होणारी डेव्हलपमेंट विचारात घेता रायगड हा विकासगड

आविष्कार देसाई ,  अलिबागरायगड जिल्ह्याला २१२ कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट गाठायचे आहे. जिल्ह्यात मोठ्या संख्येने होणारी डेव्हलपमेंट विचारात घेता रायगड हा विकासगड म्हणून नावारूपाला येत आहे. त्यामुळे ८४ कोटी रुपयांच्या जादा महसुलाचे ओझे जिल्हा प्रशासनावर टाकण्यात आल्याचे बोलले जाते. आतापर्यंत सुमारे ५० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले आहे. उर्वरित उद्दिष्ट तीन महिन्यांत पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला प्रचंड मेहनत करावी लागणार आहे. जिल्ह्यामध्ये पनवेल, उरण, कर्जत, खालापूर आणि अलिबाग या तालुक्यांत हजारो कोटी रुपयांची विकासकामे वेगाने सुरू आहेत. महसूल गोळा करण्यासाठी या तालुक्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. खनिकर्म, करमणूक, दंडात्मक कारवाई यासह अन्य मार्गाने महसूलवाढीचे प्रयत्न केले जात आहेत. नोव्हेंबर २०१५ अखेर जिल्ह्याने सुमारे ३५.५० टक्केच महसूल गोळा केल्याने महसूल विभागाच्या प्रधान सचिवांनी जिल्हाधिकारी यांना २ जानेवरीच्या पत्रान्वये नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे. जिल्ह्याला २०१४-१५ साठी सुमारे १२८ कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते. ते पूर्ण करण्यात प्रशासनाने कसलीच कसर ठेवली नाही. नैसर्गिक वाढ गृहीत न धरता मागील लक्षांकापेक्षा ८४ कोटी रुपयांचा अधिक म्हणजे २१२ कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्याचे ओझे सरकारने जिल्हा प्रशासनावर टाकले आहे. १कर्जत : तालुक्यातील महसूल विभागाने बेकायदा रेती उत्खनन करणाऱ्यांविरु द्ध दंड थोपटले आहेत. दोन दिवसांत तीन ठिकाणी धाडी टाकून बेकायदा उत्खनन करून ठेवलेली रेती जप्त करण्यात आली. तर संबंधितांकडून तब्बल ८० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.२कर्जतचे तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांनी अनधिकृत आणि बेकायदा रेती उत्खनन करणाऱ्यांविरु द्ध जोरदार मोहीम उघडली आहे. नेरळजवळ उल्हास नदीमध्ये रेती उत्खनन सुरू असल्याची माहिती दामत येथील तलाठी शिंदे यांना मिळाली. ३तहसीलदार बाविस्कर यांना माहिती सांगताच तहसीलदार, तसेच मंडल कार्यालयातील अव्वल कारकून किरण पाटील यांनी तत्काळ उल्हास नदी गाठली. तेथे नदीच्या पलिकडे रेती उत्खनन जेसीबी मशिन लावून सुरू होते. परंतु तहसीलदारांची गाडी बघताच जेसीबीचालक मशिन घेऊन नदीच्या पलीकडे निघून गेले. मात्र तेथे रेती काढणाऱ्यांकडून दोन ब्रास रेती काढलेली दिसून आली.त्याबद्दल २७ हजार रु पये दंड लावण्यात आला.४ दुसरीकडे ही कारवाई सुरू असताना अचानक एक रेती भरलेला डंपर (एमएच ०४ एफपी १४१३) तहसीलदार आणि तलाठी यांनी थांबविला. त्यात दोन ब्रास रेती आढळून आली, त्याबद्दल डंपरचालक यांच्याकडून २७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.