एपीएमसीत ८६० टन फळांची आवक; एक हजार टन कांदा बटाटा उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 01:20 AM2020-05-22T01:20:33+5:302020-05-22T01:21:16+5:30

चिकू, द्राक्ष, डाळींब, पपई, संत्री व मोसंबीचीही आवक झाली आहे. कोकणातून हापूस मोठ्या प्रमाणात आला आहे.

860 tons of fruit arrives from APM; One thousand tons of onion potatoes available | एपीएमसीत ८६० टन फळांची आवक; एक हजार टन कांदा बटाटा उपलब्ध

एपीएमसीत ८६० टन फळांची आवक; एक हजार टन कांदा बटाटा उपलब्ध

Next

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळ व कांदा- बटाटा मार्केटही गुरुवारपासून सुरू झाले आहे. दिवसभरात ८६० टन फळांची आवक झाली. आवक झाल्याने मुंबई व नवी मुंबईमधील सर्व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत झाला आहे.
दहा दिवसांच्या बंदनंतर फळ मार्केट पुन्हा सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी २६४ ट्रक, टेम्पोंतून ८६० टन फळांची आवक झाली आहे. यामध्ये ५७० टन आंबा, १३८ टन कलिंगड, ६३ टन अननस, ५२ टन खरबूजचा समावेश आहे.
चिकू, द्राक्ष, डाळींब, पपई, संत्री व मोसंबीचीही आवक झाली आहे. कोकणातून हापूस मोठ्या प्रमाणात आला आहे.
एपीएमसीमध्ये १६६ टन लसून, ३६० टन कांदा व ५०९ टन बटाट्याचीही आवक झाली आहे.

मार्केटमध्ये होतेय
सर्वांची तपासणी
मार्केटमध्ये एक हजार टन कांदा, बटाटा व लसूनही विक्रीसाठी आला आहे. त्यामुळे भाजीपाला, धान्य व मसाला मार्केटमधील व्यवहार सुरळीत सुरू आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी एपीएमसीमध्ये उपाययोजना करण्यात येत असून येणाऱ्या सर्वांची तपासणी केली जात आहे.

Web Title: 860 tons of fruit arrives from APM; One thousand tons of onion potatoes available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.