स्वच्छतागृहांसाठी ९६ जागा सापडल्या
By admin | Published: May 20, 2015 02:17 AM2015-05-20T02:17:53+5:302015-05-20T02:17:53+5:30
महिलांच्या स्वच्छतागृहांसाठी गेली दोन वर्षे जागा शोधण्यात अपयश आल्यामुळे टीकेचे धनी बनलेल्या पालिकेने अखेर ही मोहीम फत्ते केली आहे़
मुंबई : महिलांच्या स्वच्छतागृहांसाठी गेली दोन वर्षे जागा शोधण्यात अपयश आल्यामुळे टीकेचे धनी बनलेल्या पालिकेने अखेर ही मोहीम फत्ते केली आहे़ घनकचरा व्यवस्थापन खात्याने मुंबईत ९६ जागा शोधून काढल्या आहेत़ या ठिकाणी स्वच्छतागृहांना परवानगी व अन्य प्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत़ यामुळे लाखो मुंबईकर महिलांना दिलासा मिळणार आहे़
मुंबईत सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी असणाऱ्या स्वच्छतागृहांचे प्रमाण अत्यल्प आहे़ त्यामुळे कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांची प्रचंड गैरसोय होत असते़ याप्रकरणी अनेक आंदोलनानंतर ‘राइट टू पी’मोहिमेंतर्गत मुंबईत अशा स्वच्छतागृहांसाठी जागा शोधण्यास सुरुवात झाली़ या शोधाशोधीमध्ये काही वर्षे सरल्यानंतर अखेर विविध उड्डाणपुलांखाली सात व रस्ते आणि पदपथांवर ७१ तसेच उद्यान, बसस्टॉप आदी ठिकाणी काही जागा आढळून आल्या आहेत़
यापैकी काही जागा एमएमआरडीए व रेल्वे अशा अन्य प्राधिकरणांच्या अखत्यारीत आहेत़ तसेच रस्ते व पदपथांवरही अनेक जागा असल्याने पालिकेने रस्ते विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्र मागविले आहे़ रस्ते व पदपथांवर सार्वजनिक शौचालयांना सहा वर्षांपूर्वी मनाई करण्यात आली होती़ त्यामुळे या विभागाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर स्वच्छतागृहांच्या बांधकामाला सुरुवात होणार असल्याचे पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले़
(प्रतिनिधी)
च्मुंबईत सध्या १,०३५ सार्वजनिक शौचालये आहेत़ यामध्ये १३ हजार ४४१ शौचकुपे आहेत़ यापैकी केवळ ५,१३६ शौचकुपे महिलांसाठी आहेत़
च्महिलांसाठी बांधण्यात येणाऱ्या स्वच्छतागृहांची देखभाल बिगर शासकीय संस्थांकडे सोपविण्यात येणार आहे़ तसेच याचा वापर करण्यासाठी महिलांकडून नाममात्र शुल्क वसूल केले जाणार आहे़
च्मुंबईत सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी असणाऱ्या स्वच्छतागृहांचे प्रमाण अत्यल्प आहे़ त्यामुळे कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांची प्रचंड गैरसोय होत असते़
च्जानेवारी २०१३ मध्ये स्वच्छतागृहांसाठी
शहरात जागा शोधण्याची सूचना सर्व २४ विभाग कार्यालयांना महानगरपालिकेकडून देण्यात आली होती़