शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
3
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
4
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
6
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
7
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
8
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
9
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
10
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
11
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
12
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
13
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
14
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
15
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
17
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
18
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
19
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
20
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

स्वच्छतागृहांसाठी ९६ जागा सापडल्या

By admin | Published: May 20, 2015 2:17 AM

महिलांच्या स्वच्छतागृहांसाठी गेली दोन वर्षे जागा शोधण्यात अपयश आल्यामुळे टीकेचे धनी बनलेल्या पालिकेने अखेर ही मोहीम फत्ते केली आहे़

मुंबई : महिलांच्या स्वच्छतागृहांसाठी गेली दोन वर्षे जागा शोधण्यात अपयश आल्यामुळे टीकेचे धनी बनलेल्या पालिकेने अखेर ही मोहीम फत्ते केली आहे़ घनकचरा व्यवस्थापन खात्याने मुंबईत ९६ जागा शोधून काढल्या आहेत़ या ठिकाणी स्वच्छतागृहांना परवानगी व अन्य प्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत़ यामुळे लाखो मुंबईकर महिलांना दिलासा मिळणार आहे़मुंबईत सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी असणाऱ्या स्वच्छतागृहांचे प्रमाण अत्यल्प आहे़ त्यामुळे कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांची प्रचंड गैरसोय होत असते़ याप्रकरणी अनेक आंदोलनानंतर ‘राइट टू पी’मोहिमेंतर्गत मुंबईत अशा स्वच्छतागृहांसाठी जागा शोधण्यास सुरुवात झाली़ या शोधाशोधीमध्ये काही वर्षे सरल्यानंतर अखेर विविध उड्डाणपुलांखाली सात व रस्ते आणि पदपथांवर ७१ तसेच उद्यान, बसस्टॉप आदी ठिकाणी काही जागा आढळून आल्या आहेत़ यापैकी काही जागा एमएमआरडीए व रेल्वे अशा अन्य प्राधिकरणांच्या अखत्यारीत आहेत़ तसेच रस्ते व पदपथांवरही अनेक जागा असल्याने पालिकेने रस्ते विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्र मागविले आहे़ रस्ते व पदपथांवर सार्वजनिक शौचालयांना सहा वर्षांपूर्वी मनाई करण्यात आली होती़ त्यामुळे या विभागाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर स्वच्छतागृहांच्या बांधकामाला सुरुवात होणार असल्याचे पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले़ (प्रतिनिधी) च्मुंबईत सध्या १,०३५ सार्वजनिक शौचालये आहेत़ यामध्ये १३ हजार ४४१ शौचकुपे आहेत़ यापैकी केवळ ५,१३६ शौचकुपे महिलांसाठी आहेत़ च्महिलांसाठी बांधण्यात येणाऱ्या स्वच्छतागृहांची देखभाल बिगर शासकीय संस्थांकडे सोपविण्यात येणार आहे़ तसेच याचा वापर करण्यासाठी महिलांकडून नाममात्र शुल्क वसूल केले जाणार आहे़च्मुंबईत सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी असणाऱ्या स्वच्छतागृहांचे प्रमाण अत्यल्प आहे़ त्यामुळे कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांची प्रचंड गैरसोय होत असते़च्जानेवारी २०१३ मध्ये स्वच्छतागृहांसाठी शहरात जागा शोधण्याची सूचना सर्व २४ विभाग कार्यालयांना महानगरपालिकेकडून देण्यात आली होती़