नवी मुंबई मेट्रोचे ९० टक्के काम पूर्ण, बेलापूर ते पेंधर मार्गावर सेवा सुरू होणार

By कमलाकर कांबळे | Published: March 27, 2023 06:58 PM2023-03-27T18:58:56+5:302023-03-27T18:59:29+5:30

नवी मुंबई मेट्रोचे पहिल्या टप्प्यातील पेंधर ते खारघर दरम्यानचे काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे.

90 percent work of Navi Mumbai Metro completed, | नवी मुंबई मेट्रोचे ९० टक्के काम पूर्ण, बेलापूर ते पेंधर मार्गावर सेवा सुरू होणार

नवी मुंबई मेट्रोचे ९० टक्के काम पूर्ण, बेलापूर ते पेंधर मार्गावर सेवा सुरू होणार

googlenewsNext

नवी मुंबई : सिडकोचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या नवी मुंबई मेट्रोचे पहिल्या टप्प्यातील पेंधर ते खारघर दरम्यानचे काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. तर उर्वरित खारघर-बेलापूर दरम्यानची ९० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे पुढील काही महिन्यांत बेलापूर ते पेंधर या संपूर्ण मार्गावर मेट्रोची सेवा सुरू होण्याची शक्यता संबंधित विभागाने व्यक्त केली आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर सिडकोने नवी मुंबईत मेट्रोचे चार मार्ग प्रस्तावित केले आहेत. त्यापैकी पेंधर ते बेलापूर या ११ किमी लांबीच्या पहिल्याच मार्गाचे काम दीर्घकाळ रखडले आहे. परंतु, पहिल्या टप्प्यातील स्थानक क्रमांक ७ ते ११ अर्थात खारघर येथील सेेंट्रल पार्क ते पेंधर स्थानकादरम्यानच्या ५.१४ किमी अंतरातील सर्व कामे पूर्ण झाली आहेत.

प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व चाचण्या सिडकोने यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनीही या मार्गावर प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी परवानगीही दिली आहे. मात्र,उद्घाटनाचा मुहूर्त निश्चित होत नसल्याने मागील वर्षभरापासून मेट्रोचा प्रवास रखडला आहे. असे असले तरी उर्वरित म्हणजेच खारघर ते बेलापूर पर्यंतच्या मार्गाचे ९० टक्के कामे पूर्ण झाले असून, सध्या काही किरकोळ स्वरुपाची कामे सुरू आहेत. दोन तीन महिन्यांत तीसुद्धा होतील, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे. त्यामुळे पहिल्या क्रमांकाच्या मार्गाचे दोन टप्प्यात उद्घाटन करण्याऐवजी युद्धपातळीवर उर्वरित मार्गाचे काम पूर्ण करून संपूर्ण बेलापूर ते पेंधर या मार्गावर एकाच वेळी मेट्रोची प्रवासी सेवा सुरू करण्याची सिडकोची योजना आहे.

Web Title: 90 percent work of Navi Mumbai Metro completed,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.