पनवेल क्षेत्रात बसवणार ९८ लिटल बिन्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 02:27 AM2018-02-06T02:27:14+5:302018-02-06T02:27:19+5:30
पनवेल महापालिका क्षेत्रात महत्त्वाच्या ठिकाणी लिटल बिन्स बसविण्यात येणार आहेत.
कळंबोली : पनवेल महापालिका क्षेत्रात महत्त्वाच्या ठिकाणी लिटल बिन्स बसविण्यात येणार आहेत. आरोग्य सभापती डॉ. अरुण भगत यांच्या हस्ते नुकतेच या कामास सुरुवात झाली असून, आठ दिवसांत निश्चित केलेल्या जागेवर बिन्स बसविण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत होईल, असा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे.
स्वच्छ सर्व्हेक्षणात सहभागी झालेल्या पनवेल महापालिका प्रशासनाकडून अभियानांतर्गत जोरदार तयारी सुरू आहे. प्रभागनिहाय स्पर्धा जाहीर झाल्याने नगरसेवकांमध्येही चढाओढ लागली आहे. त्याचबरोबर स्वच्छता मोहीम ठिकठिकाणी सुरू आहे. शहरातील भिंती रंगवून त्यावर स्वच्छता आणि जनजागृतीपर सामाजिक संदेश रेखाटण्यात आलेले आहेत. ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करण्यासाठी गृहसंकुले, हॉटेलमालक, रेस्टॉरंटमध्ये जागृती करण्यात येत आहे. १०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाºया सोसायट्यांना कंपोस्टिंग करणे बंधनकारक करण्यात आले आहे. हॉटेलचा कचराही महापालिका
व सिडकोने उचलणे बंद केले
आहे.
रस्त्यावर कचरा दिसू नये, याकरिता कचराकुंडीमुक्त वसाहतींचा संकल्प करण्यात आला आहे, तसेच डोअर टू डोअर जाऊन कचरा संकलन करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे. आगामी काळात पनवेल चकाचक तसेच स्वच्छ दिसावे, याकरिता लिटल बिन्स बसविण्यात आले आहेत.
या वेळी स्वच्छता विभागाच्या कनिष्ठ अभियंता स्नेहा वंजारी, आरोग्य निरीक्षक दौलत शिंदे, शैलेश गायकवाड, भावेश चंदने, कळंबोलीचे अधीक्षक भगवान पाटील, प्रकाश गायकवाड यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
तीनशे लिटल बिन्स
महापालिकेत समाविष्ट असलेल्या भागात तीनशे लिटल बिन्स लावण्यात येणार आहेत. त्यापैकी ९८ बिन्स पनवेल शहरात बसविण्याचे काम हाती घेतले आहे. त्यानंतर नवीन पनवेल आणि इतर ठिकाणी बसविण्यात येणार असल्याचे कनिष्ठ अभियंता स्नेहा वंजारी यांनी सांगितले. ओला आणि सुका कचरा टाकण्याकरिता दोन बिन्सची व्यवस्था करण्यात आली आहे.
चोरी करणे कठीण
४० लिटरच्या या बिन्स स्टीलच्या तयार करण्यात आल्या आहेत. एका बिन्सचा खर्च १७ ते १८ हजार रुपये आहे. ते चोरी होऊ नये, याकरिता क्र ाँक्र ीटीकरण करून फिटिंग करण्यात आले आहे. त्याचबरोबर या बिन्सला स्क्रूही असल्याचे आरोग्य निरीक्षक दौलत शिंदे यांनी सांगितले.