दहा लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या चार बोगस पत्रकारांवर गुन्हा दाखल
By वैभव गायकर | Published: October 24, 2023 04:23 PM2023-10-24T16:23:09+5:302023-10-24T16:23:33+5:30
26 हजार घेतल्या प्रकरणी 4 बोगस पत्रकारांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पनवेल: पनवेल शहरातील एक स्पा सेंटरमध्ये दहा लाख रुपयांची मागणी करून सदर पैशे न दिल्याने वारंवार पोलीस कंट्रोलला स्पा बद्दल खोटी माहिती देऊन तक्रारदाराकडून पैशाची मागणी करून त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारे 26 हजार घेतल्या प्रकरणी 4 बोगस पत्रकारांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर स्पा सेंटरमध्ये गैरकृत्य चालू असल्याबाबत खोटी माहिती देऊन तक्रारदाराकडून एकाच वेळेला दहा लाख रुपयांची मागणी पत्रकार असल्याचे सांगणाऱ्या किरण सुरवाडे, संतोष म्हस्के, विकास झा, झाहीद दसाना यांनी करून त्याने पैसे न दिल्याने वारंवार पोलीस कंट्रोलला स्पा बद्दल खोटी माहिती देऊन तक्रारदाराकडून वेगवेगळ्या मोबाईल नंबरवर फोन पे व जी पे करून 25 हजार रुपये घेतल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यानुसार या चौघांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत. पनवेल,नवी मुंबई परिसरात बोगस पत्रकारांचा सुळसुळाट वाढला आहे.
युट्युबवर चॅनेल सुरु करून व्यावसायिक,दुकानदारांकडूना भीती दाखवून खंडणी वसुल करण्याचे काम काही तथाकथित पत्रकार करीत आहेत. पनवेल मधील घटना याचे उदाहरण आहे.