खारघरमधील घटनेची वस्तुस्थिती तपासण्याकरिता समिती नियुक्त , CMO ची ट्विट करुन माहिती

By नारायण जाधव | Published: April 20, 2023 05:44 PM2023-04-20T17:44:38+5:302023-04-20T17:47:10+5:30

या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्याकरिता एक सदस्यीय समिती नियुक्त करण्यात येत आहे.

A committee has been appointed to investigate the facts of the Kharghar incident, the CMO tweeted | खारघरमधील घटनेची वस्तुस्थिती तपासण्याकरिता समिती नियुक्त , CMO ची ट्विट करुन माहिती

खारघरमधील घटनेची वस्तुस्थिती तपासण्याकरिता समिती नियुक्त , CMO ची ट्विट करुन माहिती

googlenewsNext

नवी मुंबई-  खारघरमधील महाराष्ट्र भुषण पुरस्कार सोहळ्या दरम्यान उष्माघाताने मृत्युमुखी पावलेल्या रुग्णांचा आकडा १३ वर पोहचला आहे. या घटनेत अद्याप १० रुग्ण वेगवेगळया रुग्णालयात उपचार घेत आहेत. तेरा मृतांची ओळख सर्व मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आले आहेत. आता या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्याकरिता एक सदस्यीय समिती नियुक्त करण्यात येत आहे. महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांची ही समिती असेल. या संदर्भात सीएमओने ट्विट करुन माहिती दिली आहे. 

पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या श्रीसेवकांना उष्माघाताचा त्रास झाला. त्यातील अनेकांवर सध्या नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता या घटनेची राज्य सरकार चौकशी करणार आहे. 

खारघर (जि. रायगड) येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यानंतर झालेल्या दुर्दैवी घटनेच्या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्याकरिता एक सदस्यीय समिती नियुक्त करण्यात येत आहे. महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांची ही समिती असेल.

एका महिन्याच्या मुदतीत ही समिती याबाबतचा अहवाल सादर करेल. भविष्यातील अशा प्रकारच्या समारंभाच्या आयोजनाच्या बाबतीत कोणत्या गोष्टींची काळजी,दक्षता घ्यावी, याबाबतही ही समिती शासनास शिफारशी करेल, असं ट्विट केलं आहे.

Web Title: A committee has been appointed to investigate the facts of the Kharghar incident, the CMO tweeted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.