शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

नवी मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा! सुपर स्वच्छ लीग गटात देश पातळीवर पहिल्या तीनमध्ये झाला समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 10:50 IST

Navi Mumbai : स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबई शहराला आणखी एक मानांकन प्राप्त झाले आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियानात नव्याने समाविष्ट केलेल्या सुपर स्वच्छ लीग कॅटेगरीत नवी मुंबईचा समावेश करण्यात आला आहे.

नवी मुंबई - स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबई शहराला आणखी एक मानांकन प्राप्त झाले आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियानात नव्याने समाविष्ट केलेल्या सुपर स्वच्छ लीग कॅटेगरीत नवी मुंबईचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे देशातील तीनच शहरांचा या कॅटेगरीत समावेश आहे. त्यात महाराष्ट्रातील एकमेव म्हणजेच नवी मुंबई शहरासह मध्य प्रदेशच्या इंदौर आणि गुजरातच्या सुरतचा समावेश आहे. 

स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबई शहराने आपले स्थान अबाधित ठेवले आहे. २०२३ मध्ये देशातील द्वितीय क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून नवी मुंबई महापालिकेला मानांकन प्राप्त झाले होते. स्वच्छ सर्वेक्षणात सातत्याने अग्रक्रमावर राहिलेल्या शहरांसाठी गेल्या वर्षीपासून ‘सुपर स्वच्छ लीग’ ही नवीन कॅटेगरी निर्माण केली आहे.  

आनंदाची आणि गौरवाची बाब याअंतर्गत देशातील १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या प्रमुख शहरांच्या मुख्य गटात तीन शहरांचा समावेश केला असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील नवी मुंबई, मध्य प्रदेशातील इंदौर आणि गुजरातमधील सुरत या तीन शहरांचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान,  नवी मुंबईकरांच्या दृष्टीने ही अत्यंत आनंदाची आणि गौरवाची बाब असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी म्हटले आहे. 

सुपर लीगमुळे गुणांकनाचे स्वरूप बदलले;  दहा हजार गुणांचे मूल्यमापन असणारसुपर लीगमध्ये समावेश झाल्याने स्वच्छ सर्वेक्षणातील गुणांकनाचे स्वरूप बदलले आहे. त्यानुसार आता १० हजार गुणांचे मूल्यमापन असणार आहे. त्या गुणांच्या वर्गवारीमध्ये प्रत्यक्ष दर्शनी स्वच्छतेला १५०० गुण, घन कचऱ्यावरील शास्त्रोक्त प्रक्रियेकरिता १५००  गुण तसेच जनजागृती उपक्रमांसाठी १५०० गुण असणार आहेत. त्याचप्रमाणे वर्गीकृत कचरा संकलनाकरिता १००० गुण, शौचालय व्यवस्थापनासाठी १००० गुण, सांडपाण्यावर प्रक्रिया करून पुन:उपयोगाकरिता १००० गुण तसेच  कचरा व्यवस्थापनात माहिती तंत्रज्ञानाच्या वापरासाठी १०००  गुण असणार आहेत. तसेच तक्रार निवारणासाठी ५००  गुण, मलनि:सारण ५०० गुण आणि स्वच्छताकर्मीच्या कल्याणकारी कामांसाठी ५०० गुण अशा प्रकारे एकूण १०,००० गुणांनुसार सर्वेक्षण केले जाणार आहे.त्याशिवाय  कचरामुक्त शहर मानांकनासाठी २५०० गुण व ओडीएफ वॉटर प्लस मानांकनासाठी २५०० गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाNavi Mumbaiनवी मुंबई