घणसोलीत ट्रान्सफार्मरला आग
By नामदेव मोरे | Published: July 15, 2024 01:39 PM2024-07-15T13:39:54+5:302024-07-15T13:40:12+5:30
घणसोलीत ट्रान्सफॉर्मरला आग लागल्याने परिसरातील विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे.
नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: पावसाळ्यात ट्रान्सफॉर्मर व विद्युत केबल ला आग लागण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. सोमवारी सकाळी घणसोलीत ट्रान्सफॉर्मरला आग लागल्याने परिसरातील विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे.
येथील बाळाराम वाडी येथील ट्रान्सफॉर्मर ला सकाळी आग लागली.ट्रान्सफॉर्मर पुर्णपणे जळून गेला आहे.आग लागल्याचे समजताच तत्काळ अग्निशमन दलाच्या जवानांना बोलावण्यात आले. आगीमुळे परिसरातील विद्युत पुरवठा पूर्णपणे बंद झाला असून दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून संपूर्ण शहरात सर्व विभागात विद्युत पुरवठा खंडीत होण्याच्या घटना घडत असून सर्वाधिक समस्या घणसोली विभागात निर्माण होत आहे. वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.