कंपनीत आग; स्फोटानंतर केमिकलने नालाही पेटला; पावणेतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 01:02 PM2024-01-05T13:02:35+5:302024-01-05T13:03:01+5:30

आगीची माहिती मिळताच एमआयडीसी तसेच महापालिकेच्या अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते.

A fire in the company; The chemical also ignited the drain after the explosion; Events in Pawnee | कंपनीत आग; स्फोटानंतर केमिकलने नालाही पेटला; पावणेतील घटना

कंपनीत आग; स्फोटानंतर केमिकलने नालाही पेटला; पावणेतील घटना

नवी मुंबई : पावणे एमआयडीसीमधील मेहक या कंपनीत आग लागल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. कंपनीत काम सुरू असताना ही दुर्घटना घडली असून आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही तर आगीमुळे ड्रमचे स्फोट होऊन त्यामधील केमिकल रस्त्याने वाहत नाल्यात गेले असता तेदेखील पेटल्याने नाल्यातही आग पसरली होती. यामध्ये एका कंपनीचे नुकसान झाले आहे.

आगीची माहिती मिळताच एमआयडीसी तसेच महापालिकेच्या अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते. अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या या कंपनीचा प्रकल्प सलग तीन भूखंडावर पसरलेला आहे. तर कंपनीला लागूनच इतरही काही रासायनिक कंपन्या आहेत. त्यामुळे परिसराला आगीचा धोका निर्माण झाला होता.

कामगारांना सुरक्षित ठिकाणी हलविले
-  तुर्भे एमआयडीसी पोलिसांनीही त्याठिकाणी धाव घेऊन परिसरातील कंपन्यांमधील कामगारांना सुरक्षित ठिकाणी हलवले. अखेर फोमचा मारा करून अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवावे लागले. त्यामध्ये सुमारे पाच तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. यामध्ये कोणालाही गंभीर दुखापत झाली नसून आगीच्या कारणाचा तपास सुरू असल्याचे एमआयडीसी अग्निशमन केंद्र अधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले.

- आगीमध्ये उडणारा भडका व रस्त्यावरून नाल्यात वाहणारे केमिकलचे पाट यांनी देखील पेट घेतला होता. त्यामुळे नाल्यातल्या झाडांनीदेखील पेट घेऊन धुराचे लोट निघत होते.
 

Web Title: A fire in the company; The chemical also ignited the drain after the explosion; Events in Pawnee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग