भक्ष्यासाठी थेट घरात घुसलेल्या साडेचार फूट लांबीच्या घोरपडीची प्राणीमित्रांनी केली सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 07:38 PM2023-09-13T19:38:53+5:302023-09-13T19:39:30+5:30
वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नैसर्गिक आवासात मुक्त केले.
मधुकर ठाकूर
उरण : भक्ष्याच्या शोधार्थ बुधवारी घरात घुसलेल्या एका साडेचार फूट लांबीच्या घोरपडीला ( मॉनिटर लिझर्ट ) शिताफीने पकडून चिरनेरच्या वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नैसर्गिक आवासात मुक्त केले.
चिरनेर येथील आदित्य मढवी यांच्या घरात बुधवारी (१३) साडेचार फूट लांबीची घोरपड शिरली. कोंबड्यांची अंडी खाण्यासाठी घरात घुसलेल्या या घोरपडीची माहिती चिरनेरच्या वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सदस्यांना देण्यात आली.संस्थेचे सदस्य असलेल्या विवेक केणी,पंकज घरत यांनी घरात घुसलेल्या आणि लपून बसलेल्या साडेचार फूट लांबीच्या घोरपडीला शिताफीने पकडले.
त्यानंतर प्राणी मित्रांनी सापडलेल्या घोरपडीची वनविभागाला माहिती दिली.उरण वनविभागाचे अधिकारी भाऊसाहेब डिव्हिलकर, वनरक्षक समीर इंगोले, पी.बी.पाटील यांना घोरपडीच्या आरोग्याची तपासणी केली.तपासणीनंतर प्राणीमित्रांनी घोरपडीला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने चिरनेर येथील डोंगरातील नैसर्गिक आवासात मुक्त केले.