चार फुट लांबीच्या नागाला जंगलात सोडले , सर्पमित्र राजेश नागवेकर यांची कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 07:48 PM2023-06-20T19:48:41+5:302023-06-20T19:48:50+5:30
येथील डोंगरी गावातील एका घराशेजारी चार फूट लांबीचा नाग आढळून आला होता.
मधुकर ठाकूर
उरण : येथील डोंगरी गावातील एका घराशेजारी चार फूट लांबीचा नाग आढळून आला होता.चिरनेर येथील फ्रेंड्स ऑफ नेचर निसर्ग संवर्धन संस्थेचे सदस्य सर्पमित्र राजेश नागवेकर यांनी विषारी नागाला सुरक्षितपणे पकडून जंगलात सोडून दिले.
तालुक्यातील डोंगरी येथील रहिवासी राज घरत यांच्या घराजवळ असलेल्या रेती, सिमेंटच्या गोणींच्या खाली साप शिरल्याची माहिती सर्पमित्रांना दिली होती. फ्रेंड्स ऑफ नेचर निसर्ग संवर्धन संस्थेचे सदस्य सर्पमित्र राजेश नागवेकर यांनी रेती, सिमेंटच्या गोणींच्या खाली लपून बसलेल्या चार फूट लांबीचा विषारी नागाला सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक आवासात सोडून दिल्याची माहिती सर्पमित्र राजेश नागवेकर यांनी दिली.