वैभव गायकर पनवेल:अवघ्या काही तासांचा पाहुणचार घेऊन दीड दिवसांचे बाप्पा बुधवार दि.20 रोजी आपल्या घरी रवाना झाले. शहरामध्ये दीड दिवसांसाठी बाप्पाला घरी आणण्याची प्रथा मोठ्या प्रमाणात आहे.नजीकच्या काळात दीड दिवासांची संख्या वाढली आहे.या बाप्पांच्या विसर्जनासाठी पालिका प्रशासनाने विविध विसर्जन घाटांवर उपाययोजना राबविल्या.
पालिकेच्या मूर्तीदान उपक्रमाला देखील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पालिका क्षेत्रात प्रत्येक चौकात पालिकेने मूर्तीदान करण्यासाठी 78 मूर्तीदान केंद्र उभारले आहेत.पनवेल महापालिकेतर्फे 59 ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे.संध्याकाळी उशिरा पर्यंत पालिकेच्या विविध विसर्जन घाटांवर जवळपास 157 गणपती विसर्जन करण्यात आले होते.विसर्जन घाटांवर पोलीस बंदोबस्त तसेच पालिकेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी तैनात करण्यात आले होते.बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तांनी ढोल ताशाचा पथक ,बँड पथका नियोजन केले होते.