Video: चक्क सुलभ शौचालयात ठेवला जातो पाणीपुरीचा स्टॉल, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 12:28 PM2022-12-23T12:28:09+5:302022-12-23T12:30:03+5:30

वाशी रेल्वे स्थानकातून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे

A panipuri stall is kept in a very convenient toilet of vashi railway station, the video goes viral | Video: चक्क सुलभ शौचालयात ठेवला जातो पाणीपुरीचा स्टॉल, व्हिडिओ व्हायरल

Video: चक्क सुलभ शौचालयात ठेवला जातो पाणीपुरीचा स्टॉल, व्हिडिओ व्हायरल

Next

नवी मुंबई - मुंबईतील चाकरमान्यांसाठी रेल्वे स्थानकातील चॅट, भेळपुरी आणि येथील स्टॉल हे दैनंदिन खाद्यपदार्थाचं ठिकाण बनलेलं असतं. कारण, स्टेशनवरुन जाता-येता पोटाला थोडासा आरास देण्यासाठी किंवा जीभेची चव भागविण्यासाठी मुंबईकर आणि प्रवाशी रेल्वे स्थानकांवरील चॅट स्टॉलवर अनेकदा गर्दीही करतात. मात्र, रेल्वे स्थानकावरील हे चॅट स्टॉल किंवा पाणीपुरीची दुकाने रात्रीच्यावेळी कुठे ठेवलेली असतात, हे गाडे आडोशाला म्हणून चक्क रेल्वे स्थानकातील मुतारीत आढळून आल्याने नेटीझन्सने संताप व्यक्त केला आहे. नवी मुंबईच्या वाशी रेल्वे स्थानकावरील ही घटना उघडकीस आली आहे. 

वाशी रेल्वे स्थानकातून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकाच्या शौचालयामध्ये पाणीपुरीचा स्टॉल ठेवलेला आढळल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. एक शीतपेयाची मशीन आणि त्यावर पाणीपुरीच्या पुऱ्या ठेवल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत असून हा व्हिडिओ पाहून नागरिक संताप व्यक्त करत आहेत. येथील सार्वजनिक शौचालयात गेले असता, एका व्यक्तीने हा व्हिडिओ शूट करुन सोशल मीडियावर अपलोड केला होता. त्यानंतर, हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने आता वाशी स्टेशन परिसरात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याची संतप्त भावना नेटीझन्सने व्यक्त केली आहे. तसेच, संबंधित पाणीपुरी स्टॉलवाल्यावर आणि सुलभ शौचालय चालकावर कारवाई करावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता रेल्वे प्रशासन काय भूमिका घेणार, काय कारवाई करणारे हे पहावे लागणार आहे. मात्र, रेल्वे स्थानकावरील स्टॉलवर चॅट मसाला-पुरी खाण्यापूर्वी आपण त्या स्टॉलच्या स्वच्छतेची खात्री करुन घ्यायला हवी. यापूर्वीही एका पाणीपुरीवाल्याचा असाच व्हिडिओ व्हायरल झाला झाला होता, जो शौचलयातील पाण्याचा वापर करत असल्याचे समोर आले होते. 
 

Web Title: A panipuri stall is kept in a very convenient toilet of vashi railway station, the video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.