हापूस पेटीला विक्रमी १२ हजार रुपये भाव; ३८० पेट्या हापूसची आवक  

By नामदेव मोरे | Published: January 29, 2024 07:01 PM2024-01-29T19:01:00+5:302024-01-29T19:01:15+5:30

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोकणातून ३८० पेट्या हापूस आंब्याची आवक झाली आहे.

A record price of 12 thousand rupees for Hapus box Inflow of 380 boxes of Hapus | हापूस पेटीला विक्रमी १२ हजार रुपये भाव; ३८० पेट्या हापूसची आवक  

हापूस पेटीला विक्रमी १२ हजार रुपये भाव; ३८० पेट्या हापूसची आवक  

नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोकणातून ३८० पेट्या हापूस आंब्याची आवक झाली आहे. ४ ते ८ डझनच्या पेटीला ७ हजार रुपयांपासून १२ हजार रुपये भाव मिळाला आहे. १० फेब्रुवारीपासून आवक वाढणार असून यावर्षी चार महिने खवय्यांना मुबलक आंबे उपलब्ध होणार आहेत. कोकणात हापूसचे पिक चांगले आले आहे. मुंबई बाजार समितीमध्ये सोमवारी आवक वाढली आहे. ३८० पेट्यांची आवक झाली असून त्यामध्ये देवगडवरून २५० पेट्या, रत्नागिरीमधून ८० व रायगडमधील बानकोट परिसरातून जवळपास ६० बॉक्सची आवक झाली आहे. 

नवीन वर्षाच्या अखेरीस नियमीत आवक सुरू झाल्यामुळे बाजारसमितीमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. होलसेल मार्केटमध्ये ७ ते १२ डझन वजनाच्या पेटीला ७ हजार रुपयांपासून १२ हजार रुपये भाव मिळाला आहे. डझनचा भाव १ ते २ हजार रुपये एवढा आहे. यावर्षी १० फेब्रुवारीपासून कोकणातील हापूसची आवक वाढणार आहे. मे महिन्यापर्यंत चार महिने खवय्यांना कोकणचा हापूस उपलब्ध होणार आहे. इतर राज्यांमधूनही आंबा मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येण्याची शक्यता आहे.

हंगामातील सर्वाधीक आवक सोमवारी झाली आहे. देवगड, राजापूर, बानकोट परिसरातून हापूस विक्रीसाठी आला आहे. १० फेब्रुवारीपासून आवक वाढणार असून चार महिने ग्राहकांना हासूप मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल. - संजय पानसरे, संचालक फळ मार्केट. 

Web Title: A record price of 12 thousand rupees for Hapus box Inflow of 380 boxes of Hapus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.