कामोठे-मानसरोवर रेल्वे स्थानक परिसरात आगीची पुनरावृत्ती टळली 

By वैभव गायकर | Published: December 1, 2023 03:28 PM2023-12-01T15:28:52+5:302023-12-01T15:32:38+5:30

सतर्क नागरिकांनी तत्काळ प्रशासनाच्या ही बाब निदर्शनास आणल्याने आज लागलेल्या आगीच्या घटनेवर नियंत्रण मिळविण्यात आली. 

A repeat of the fire was avoided in the Kamothe-Mansarovar railway station area | कामोठे-मानसरोवर रेल्वे स्थानक परिसरात आगीची पुनरावृत्ती टळली 

कामोठे-मानसरोवर रेल्वे स्थानक परिसरात आगीची पुनरावृत्ती टळली 

पनवेल : कामोठे मानसरोवर रेल्वे स्थानक परिसरात मागील वर्षी आगीच्या घटनेने पार्क केलेल्या जवळपास 50 गाड्या जळून खाक झाल्याची घटना घडली होती. या घटनेची नोंद कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. या घटनेची पुनरावृत्ती दि.1 रोजी घडली असती. मात्र सतर्क नागरिकांनी तत्काळ प्रशासनाच्या ही बाब निदर्शनास आणल्याने आज लागलेल्या आगीच्या घटनेवर नियंत्रण मिळविण्यात आली. 

शुक्रवार दि.1 रोजी दुपारी 1 ते 2 च्या सुमारास मानसरोवर स्थानक परिवारात वाढलेल्या गावातला कोणीतरी आग लावली.आगीने तत्काळ पेट धरत परिसरातील गवत भक्ष करून टाकला. काही नागरिकांनी ही बाब माजी नगरसेवक विकास घरत यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर विकास घरत यांनी तत्काळ पालिकेचे प्रभाग अधिकारी अरविंद पाटील आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. 

यावेळी काही मिनिटातच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.काही काळातच आगीवर नियंत्रणात मिळविण्यात आले. विशेष म्हणजे याच वर्षी अशाचप्रकारच्या घटनेने या परिसरात 50 पार्किंग केलेल्या दुचाकी जळाल्या होत्या. या घटनेचा सूत्रधार अद्याप पोलिसांच्या हातात लागला नाही. मात्र पुन्हा एकदा या घटनेची पुनरावृत्ती जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून विकास घरत यांच्यामुळे टळली. 

सिडकोने याठिकाणी पार्किंग व्यवस्था उभारली पाहिजे. शहराचा विस्तार वाढत आहे. प्रवासी संख्या झपाट्याने वाढत असल्याने सिडकोने लवकरात लवकर या परिसरात अत्याधुनिक पार्किंग व्यवस्था उभारावी अन्यथा अशा घटना घडत राहतील. नागरिकांनी देखील अशा ठिकाणी वाहने पार्क करू नयेत. 
- विकास घरत (माजी नगरसेवक ,कामोठे )

Web Title: A repeat of the fire was avoided in the Kamothe-Mansarovar railway station area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :panvelपनवेल