विष्णूचे दहा अवतार कोरलेली तलवार, प्रभू रामचरणी शिवप्रेमी करणार अर्पण 

By नामदेव मोरे | Published: January 18, 2024 09:02 AM2024-01-18T09:02:09+5:302024-01-18T09:02:24+5:30

खड्गाच्या मुठीला सोन्याचा मुलामा देण्यात आला असून, पातीवर विष्णूचे दहा अवतार कोरलेले आहेत.  श्रीराम मंदिर उभारणीमुळे देशात  राममय वातावरण झाले आहे.

A sword engraved with the ten incarnations of Vishnu, will be offered to Lord Ramchari by lovers of Shiva | विष्णूचे दहा अवतार कोरलेली तलवार, प्रभू रामचरणी शिवप्रेमी करणार अर्पण 

विष्णूचे दहा अवतार कोरलेली तलवार, प्रभू रामचरणी शिवप्रेमी करणार अर्पण 

नवी मुंबई : अयोध्येमधील राममंदिरासाठी देशभरातून मौल्यवान वस्तू पाठविल्या जात आहेत. शस्त्रसंग्राहक व अभ्यासक नीलेश सकट यांनी ८० किलो वजनाचे नंदन खड्ग अस्त्र तयार केले आहे. खड्गाच्या मुठीला सोन्याचा मुलामा देण्यात आला असून, पातीवर विष्णूचे दहा अवतार कोरलेले आहेत. 
श्रीराम मंदिर उभारणीमुळे देशात  राममय वातावरण झाले आहे.

प्रभू रामचंद्रांच्या प्रमुख शस्त्रांमध्ये नंदन खड्गाचाही समावेश होता. यामुळे महाराष्ट्रातून नंदन खड्ग मंदिरासाठी भेट देण्याचा निर्णय इतिहासाचे अबोल साक्षीदार संस्थेचे प्रमुख व शस्त्रसंग्राहक, अभ्यासक नीलेश सकट यांनी घेतला. त्यांनी यापूर्वी पालीच्या खंडोबासाठी ९८ किलो वजनाची तलवार तयार करून दिली होती. राममंदिरासाठी त्यांच्या आवडीचे नंदन खड्ग तयार केले आहे.

मूठ पूर्णपणे पितळेची
    खड्गाची मूठ पूर्णपणे पितळेची असून, पाते पोलादाचे आहे. भारतीय शस्त्र परंपरेतील पटिसा प्रकारातील हे खड्ग आहे. 
    त्यांचे वजन ८० किलो व उंची सात फूट दाेन इंच आहे.
    यावर विष्णूच्या अवताराबरोबर पद्म, शंख, गदा, चक्र ही सुचिन्ह अंकित केली आहेत.  

१८ वर्षांपासून भारतीय शस्त्रास्त्रांचा अभ्यास करत आहे. १२ वर्षांपासून महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक राज्यांत शस्त्रप्रदर्शन  भरवून नागरिकांना शस्त्रास्त्रांची माहिती देण्याचे काम करत आहे. आतापर्यंत ७०० पेक्षा जास्त प्रदर्शने भरविली आहेत. संग्रहात दाेन हजार शस्त्रे आहेत. प्रभू रामचरणी अर्पण करण्यासाठी ८० किलो वजनाचे  नंदन खड्ग तयार केले आहे. 
-नीलेश सकट, 
शस्त्र अभ्यासक व संग्राहक

Web Title: A sword engraved with the ten incarnations of Vishnu, will be offered to Lord Ramchari by lovers of Shiva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.