हृदयरोगावरील आपत्कालीन प्रक्रियेसाठी चिमुकल्याने केला मॉरिशस ते नवी मुंबई ४६०० किमीचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2023 05:25 PM2023-03-09T17:25:28+5:302023-03-09T17:26:04+5:30

मॉरिशस मधील चिमुकल्यावर नवी मुंबईत हृदय क्षस्त्रक्रिया...

A toddler traveled 4600 km from Mauritius to Navi Mumbai for an emergency heart procedure | हृदयरोगावरील आपत्कालीन प्रक्रियेसाठी चिमुकल्याने केला मॉरिशस ते नवी मुंबई ४६०० किमीचा प्रवास

हृदयरोगावरील आपत्कालीन प्रक्रियेसाठी चिमुकल्याने केला मॉरिशस ते नवी मुंबई ४६०० किमीचा प्रवास

googlenewsNext

नवी मुंबई - अकाली जन्मलेल्या आणि जन्मजात गंभीर हृदयरोग आणि मूत्रपिंड पूर्णपणे निकामी झालेल्या मॉरिशस येथील १० दिवसांच्या बाळाला, नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथे हृदयरोगावरील जीवनदान देणारी प्रक्रिया करण्यासाठी ४६०० किमी अंतर पार करून भारतात आणण्यात आले. मॉरिशसमध्ये स्टेबलायझेशन (स्थिरीकरण) झाल्यानंतर बाळाला पुढील उपचारांसाठी नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथे पाठवण्यात आले. अपोलो हॉस्पिटल्समध्ये को-आर्क्टोप्लास्टी करण्यात आली, ज्यामध्ये बाळाच्या महाधमनीचा अरुंद भाग रुंद करण्यासाठी ऍब्जर्बेबल (शोषणयोग्य) स्टेंट बसवण्यात आले. ही प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आणि बाळाला तीन दिवसांनी यांत्रिक व्हेंटिलेटरच्या मदतीशिवाय श्वास घेता आला.

डॉ.भूषण चव्हाण, सल्लागार-बालरोग कार्डिओलॉजी, अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई म्हणाले,"भारतात आणल्यावर बाळाची प्रकती चिंताजनक झाली होती. बाळाला जन्मजात हृदयविकाराचा गंभीर त्रास होता ज्यासाठी लगेच उपचार करणे आवश्यक होते. आम्ही आपत्कालीन को-आर्क्टोप्लास्टी केली या प्रक्रियेमध्ये महाधमनीचा अरुंद भाग रुंद करण्यासाठी ऍब्जर्बेबल (शोषणयोग्य) स्टेंट बसवण्यात येते. या प्रक्रियेनंतर बाळाच्या अवस्थेत लक्षणीयरित्या सुधारणा दिसून आली. बाळाच्या इतर समस्या लक्षात घेता, बाळाला सर्वसमावेशक वैद्यकीय सेवा प्रदान करणारा हा एक बहु-कुशल अशा टीमचा उत्तम प्रयत्न होता."

मॉरिशसमधील रुग्णालयात बाळाचा नॉर्मल डिलिव्हरीद्वारे अकाली जन्म झाला. जन्म झाल्यावर लगेच बाळ लंगडे (दिव्यांग), सायनोज्ड (निळसर) झाले होते आणि त्याला श्वास घेण्यातही त्रास होत होता. बाळाला निओनॅटल आयसीयू मध्ये हलवण्यात आले, जिथे बाळाला जन्मजात गंभीर हृदयरोग, मूत्रपिंड पूर्णपणे निकामी आणि बायलॅटरियल लो-सेट इयर्स यासह डिस्मोर्फिक फीचर्स, हायपरट्रोफाइड (अतिवृद्धी) झालेले हात आणि पाय व बायलॅटरियल क्लबफूट या समस्या असल्याचे आढळून आले. हृदय स्थिर झाल्यानंतर बाळाला प्रगत उपचार प्रदान करण्यासाठी आणि व्यवस्थापनासाठी नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथे पाठवण्यात आले. अपोलोमध्ये दाखल केल्यानंतर बाळाला श्वसनाचा तीव्र त्रास होऊ लागला म्हणून त्याला इंट्यूबेशन करुन यांत्रिक व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. मूत्रपिंड काम करणे बंद झाले तसेच कार्डिओजेनिक शॉकमुळे (हृदयाला झटका बसल्यामुळे) बाळावर को-आर्क्टोप्लास्टी हृदयरोग व्यवस्थापन सुरु करण्यात आले. त्यानंतर बाळाला शांत करण्यात आले आणि यांत्रिक व्हेंटिलेशन सुरु ठेवले गेले. बाळामध्ये वैद्यकीयदृष्ट्या सुधारणा दिसू लागली आणि तीन दिवसांनंतर हळूहळू व्हेंटिलेटर काढून टाकण्यात आले.

श्री.संतोष मराठे, सीईओ-प्रादेशिक पश्चिमी क्षेत्र, अपोलो होस्पिटल्स म्हणाले,"अपोलो हॉस्पिटल्समध्ये आम्ही आमच्या वयाने सर्वात लहान व बाळ असलेल्या रुग्णांसह सर्वच रुग्णांना उच्च स्तरातील वैद्यकीय सेवा प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहोत. आमचे कुशल चिकित्सक, परिचारिका आणि सहाय्यक कर्मचारी या नवजात बालकाचे आरोग्य राखण्यासाठी आणि त्याला रोगमुक्त करण्यासाठी सक्षम आहेत.’’ एएचएनएम द्वारे एक अतिशय व्यस्त असलेली लहान मुलांवरील हृदयरोगाचे उपचार करण्यासाठी संस्था चालवली जाते, ज्यामध्ये तपासणी, शस्त्रक्रियात्मक उपचार, शस्त्रक्रियेनंतरची वैद्यकीय सेवा आणि पूर्ववत करण्यासाठी दिली जाणारी सेवा (रिहॅब सर्व्हिसेस) यामध्ये पुरवल्या जाणाऱ्या सर्वसमावेशक वैद्यकीय सेवांचा मोठ्या प्रमाणात देशातील आणि आंतरराष्ट्रीत स्तरावरील रुग्णांना फायदा होत आहे.’’
 

Web Title: A toddler traveled 4600 km from Mauritius to Navi Mumbai for an emergency heart procedure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.