नवी मुंबई : ऐरोली सेक्टर ३ मधील घराच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळून एक महिला गंभीर जखमी झाली. पायाला व डोक्याला जखम झाली असून उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. नवी मुंबईमधील बैठ्या चाळींच्या दुरूस्तीसाठी व वाढीव एफएसआयसह बांधकामास महानगरपालिकेकडून परवानगी मिळत नाही. यामुळे अनेक नागरिकांना नाईलाजाने धोकादायक घरात रहावे लागत आहे.
ऐरोली सेक्टर ३ मध्येही अशीच स्थिती झाली आहे. येथील डी १३६ या सदनीकेमधील छताचे प्लास्टर दुपारी अचानक कोसळले. या दुर्घटनेमध्ये शांतीदेवी पाल ही महिला गंभीर जखमी झाली आहे. तीच्या डोक्याला व पायाला दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी इंद्रावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ऐरोलीसह शहरातील इतर विभागामधील बैठ्या चाळींची दुरावस्था झाली आहे. नागरिकांनी मागणी करूनही त्यांना बांधकाम परवानगी मिळत नाही. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना धोकादायक घरामध्ये वास्तव्य करावे लागत आहे.
ऐरोली सेक्टर ३ मध्ये स्लॅबचा काही भाग कोसळून एक महिला जखमी झाली आहे. प्रशासनाने आत्तातरी बंद केलेल्या बांधकाम परवानगीचा पुनर्विचार करून सर्वसामान्य नागरिकांची अपघाताच्या सावटातून मुक्तता करावी.- मनोज हळदणकर, माजी विरोधी पक्ष नेते, नवी मुंबई महानगरपालिका