भयंकर! आधी आठ वर्षाच्या मुलीला फेकलं, नंतर आईनेही 29व्या मजल्यावरून मारली उडी; मॅरॅथॉन सोसायटीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 19:48 IST2025-03-13T19:45:14+5:302025-03-13T19:48:01+5:30
Panvel Crime News: मैथिलीने आधी घराच्या खिडकीतून दुवाला खाली फेकून दिले. त्यानंतर स्वतः उडी मारून आत्महत्या केली.

भयंकर! आधी आठ वर्षाच्या मुलीला फेकलं, नंतर आईनेही 29व्या मजल्यावरून मारली उडी; मॅरॅथॉन सोसायटीतील घटना
-वैभव गायकर, पनवेल
आठ वर्षाच्या मुलीला स्वतः राहत असलेल्या 29व्या मजल्यावरील घरातून खाली फेकले आणि नंतर आईनेही उडी मारून आत्महत्या केली. पनवेलमध्ये ही धक्कादायक घटना 12 मार्च रोजी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत आठ वर्षाची मायरा दुवा व आई मैथिली आशिष दुवा (वय 37) यांचा जागीच मृत्यू झाला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पळस्पे फाटा परिसरात असलेल्या नेक्सॉन मॅरेथॉनमधील औरा या भव्य टॉवरमध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेने बिल्डिंगमध्ये 29व्या मजल्यावर राहणाऱ्या दुवा कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
महिलेने मुलीसह का केली आत्महत्या?
मानसिक अवस्था ठीक नसल्याने मैथिलीने टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. या घटनेची फिर्याद मैथिलीचे पती आशिष दुवा यांनी दिली आहे.
मैथिलीने आधी घराच्या खिडकीतून दुवाला खाली फेकून दिले. त्यानंतर स्वतः उडी मारून आत्महत्या केली. मॅरेथॉन नेक्सथॉन ही उच्चभ्रू सोसायटी म्हणून ओळखली जाते. ऐन होळी सणाच्या तोंडावर ही घटना घडल्याने या सोसायटीत शोककळा पसरली आहे.
पनवेल शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक प्रियांका शिंदे या घटनेबाबत अधिक तपास करीत आहेत.