मैत्रिणीची हत्या करून तरुणाची आत्महत्या; प्रेमसंबंधांचा भयंकर शेवट!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 08:17 PM2024-08-08T20:17:23+5:302024-08-08T20:17:52+5:30

एनआरआय मधील घटना : सोशल मीडियाद्वारे दोन वर्षांपासून ओळख.

A young man ends life afte killing his 19 year old girlfriend | मैत्रिणीची हत्या करून तरुणाची आत्महत्या; प्रेमसंबंधांचा भयंकर शेवट!

मैत्रिणीची हत्या करून तरुणाची आत्महत्या; प्रेमसंबंधांचा भयंकर शेवट!

नवी मुंबई - सूर्यकांत वाघमारे 
 
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : मैत्रिणीची हत्या करून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी संध्याकाळच्या सुमारास एनआरआय परिसरात घडली. यामध्ये तरुणीचा घटनास्थळी मृतदेह आढळून आला. मात्र खाडीत उडी टाकलेल्या तरुणाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी देखील मिळून आला नाही. 

भाविका मोरे (१९) असे मृत तरुणीचे नाव असून ती सीवूड परिसरात राहणारी आहे. तिची सोशल मीडियाद्वारे दोन वर्षांपासून सात्विक पाटील याच्यासोबत ओळख होती. यातून त्यांच्यात प्रेमसंबंध आले होते अशीही माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. मात्र मागील चार महिन्यांपासून दोघे वेगळे झाले होते. यावरून त्यांच्यात वाद सुरु होता. त्यातूनच मंगळवारी दोघेही एकमेकांना भेटले होते.

बुधवारी देखील सात्विक याने तिला डीपीएस शाळेच्या मागील निर्मनुष्य ठिकाणी भेटीसाठी बोलवले होते. त्याठिकाणी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला असता सात्विक याने भाविकाचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर एका छोट्या नाल्यात तिचा मृतदेह टाकून डोक्यावर लादी टाकली होती. तर भाविकाच्या हत्येनंतर सात्विक याने देखील काही अंतरावरच असलेल्या पुलावरून खाडीत उडी मारली. यावेळी त्याठिकाणी मासेमारी करणाऱ्या काहींनी त्याला वाचवण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र पाण्याचा दबाव जास्त असल्याने तो वाहून गेला. बुधवारी रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेऊनही तो मिळून आला नाही. त्यानंतर गुरुवारी देखील खाडीलगतच्या भागात त्याचा मृतदेहाचा पोलिसांकडून शोध घेण्यात आला असता पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. 

सोशल मीडियाद्वारे भाविका व सात्विक एकमेकांच्या संपर्कात होते. चार महिन्यांपासून त्यांच्यात वाद सुरु होते. बुधवारी दोघे भेटले असता झालेल्या भांडणातून सात्विकने भाविकाचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर स्वतः खाडीत उडी मारली असून त्याचा शोध सुरु आहे.
पंकज डहाणे, पोलिस उपायुक्त. 

Web Title: A young man ends life afte killing his 19 year old girlfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.