शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अटक, पनवेल स्थानकाबाहेर सापळा रचून कारवाई

By सूर्यकांत वाघमारे | Published: March 18, 2024 7:51 PM

यावेळी रेल्वेने प्रवास करून आलेला एकजण पोलिसांच्या नजरेस पडताच त्याला थांबवण्याचा इशारा केला.

नवी मुंबई : पनवेल रेल्वेस्थानकाबाहेरून पोलिसांनी एकाला अटक करून त्याच्याकडील पिस्तूल जप्त केले आहे. अटक केलेला तरुण मूळचा उत्तर प्रदेशचा असून त्याठिकाणी तो शस्त्र विक्रीसाठी आला असावा अशी शक्यता आहे. तत्पूर्वीच पनवेल शहर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 

पनवेल रेवेस्थानकाबाहेर एकजण अग्निशस्त्र विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळाली होती. त्यावरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनोद लभडे, अभयसिंह शिंदे, हवालदार अविनाश गंथडे, नितीन वाघमारे, महेंद्र आयकर, सूर्यकांत कुडावकर, प्रसाद घरत, किरण कराड, साईनाथ मोकळ आदींचे पथक केले होते. त्यांनी रविवारी संध्याकाळच्या सुमारास पनवेल स्थानकाबाहेर पार्किंगमध्ये सापळा रचला होता.

यावेळी रेल्वेने प्रवास करून आलेला एकजण पोलिसांच्या नजरेस पडताच त्याला थांबवण्याचा इशारा केला. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पाठलाग करून पकडण्यात आले. यावेळी त्याच्याकडील बॅगची झडती घेतली असता त्यामध्ये एक जिवंत पिस्तूल व दोन काडतुसे आढळून आले. याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. यावरून त्याठिकाणी तो शस्त्र विक्रीसाठी आला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. अंकित सुरेश कुमार (२३) असे सदर तरुणाचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. त्याच्यावर पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबई