५० पैसेखालील आणेवारीत एकाही गावाचा समावेश नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 01:47 AM2021-01-13T01:47:08+5:302021-01-13T01:47:15+5:30
पालघर जिल्ह्यामध्ये पैसेवारी जाहीर : ३२ गावे पीक पैसेवारीविना
हितेन नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : पालघर हा आदिवासीबहुल कृषिप्रधान जिल्हा असून जिल्ह्यात आठ तालुक्यांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यातील एकाही गावांत ५० पैसेखालील आणेवारी नसल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.
पालघर तालुक्यात एकूण गावांची संख्या २२४ असून खरीप गावांची संख्या २१४ आहे. अंतिम पैसेवारी जाहीर केलेल्या गावांची संख्या २१४ तर पैसेवारी जाहीर न केलेल्या गावांची संख्या १० आहे.
डहाणू तालुक्यात एकूण गावांची संख्या १८३ असून खरीप गावांची संख्या १८१ आहे. अंतिम पैसेवारी जाहीर केलेल्या गावांची संख्या १८१ तर पैसेवारी जाहीर न केलेल्या गावांची संख्या दोन आहे. वाडा तालुक्यात एकूण गावांची संख्या १७२ असून खरीप गावांची आणि अंतिम पैसेवारी जाहीर केलेल्या गावांची संख्या १७० आहे. अंतिम पैसेवारी जाहीर न केलेल्या गावांची संख्या दोन आहे.
विक्रमगड तालुक्यात गावांची संख्या ९४ असून खरीप गावांची आणि अंतिम पैसेवारी जाहीर केलेल्या गावांची संख्या ९४ आहे. जव्हार तालुक्यात गावांची संख्या १०९ असून या सर्वच गावांमध्ये अंतिम पैसेवारी जाहीर झालेली आहे. मोखाडा तालुक्यातील सर्वच ५९ गावांची पैसेवारी जाहीर झालेली आहे. तलासरी तालुक्यातही सर्वच ४२ गावांमध्ये पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे.
पालघर जिल्ह्यातील एकूण ३२ गावांमध्ये भातपीक नसल्यामुळे पीक पैसेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यात देलवाडी, अकरपट्टी, दांडी, नवापूर, आशेरी, नवी दापचारी, खारमेद्री, खारवडश्री, नवी अकरपट्टी, नवी पोफरण, डहाणू, मल्याण, वर्धा, शिळ, समेळ, सोपारा, निळेमोरे, तुळींज, नवघर, कराडी, तरखड, आक्तन, नायगाव, चोबारे, किरवली, पाली, निर्मळ, विरार, मनवेलपाडा, आचोळे, वालीव, सातिवली, आगाशी, धोवली या गावांचा यामध्ये समावेश आहे.
वसईतील पैसेवारी
वसई तालुक्यात गावांची संख्या १२५ इतकी असून खरीप गावांची संख्या १०५ आहे. अंतिम पैसेवारी जाहीर केलेल्या गावांची संख्या १०५ इतकी असून अंतिम पैसेवारी जाहीर न केलेल्या गावांची संख्या २० आहे.