खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची 'आप'ची मागणी

By योगेश पिंगळे | Published: April 20, 2023 04:38 PM2023-04-20T16:38:21+5:302023-04-20T16:39:35+5:30

आप पनवेल-रायगड च्या वतीने आप महाराष्ट्र राज्य समिती सदस्य आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी कळंबोली येथील एमजीएम रुग्णालय, तसेच खारघर येथील टाटा रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या श्री सदस्यांची भेट घेतली.

AAP demands that a case be filed against the organizers of the Maharashtra Bhushan Award ceremony at Kharghar | खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची 'आप'ची मागणी

खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची 'आप'ची मागणी

googlenewsNext

नवी मुंबई : खारघर येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात उष्माघाताने नागरिकांच्या मृत्यू प्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी खारघर पोलीस ठाण्यात केली आहे.

आप पनवेल-रायगड च्या वतीने आप महाराष्ट्र राज्य समिती सदस्य आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी कळंबोली येथील एमजीएम रुग्णालय, तसेच खारघर येथील टाटा रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या श्री सदस्यांची भेट घेतली. त्यानंतर खारघर पोलिस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याच्या आयोजकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची लेखी मागणी केली.

यावेळी आप चे महाराष्ट्र राज्य समितीचे सचिव धनंजय शिंदे, कोकण विभाग संयोजक डाॅ.अल्तमश फैजी, पनवेलचे अध्यक्ष अ‍ॅड. जयसिंग शेरे, खारघर अध्यक्ष योगेश तिरूवा, रायगड अध्यक्ष मनोज घरत आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: AAP demands that a case be filed against the organizers of the Maharashtra Bhushan Award ceremony at Kharghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.