अयोध्येकडे जाणाऱ्या आस्था ट्रेनमध्ये फेकला जळता मोबाइल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 12:38 PM2024-02-08T12:38:15+5:302024-02-08T12:38:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : श्रीरामलल्लांच्या दर्शनासाठी पुणे येथून अयोध्येकडे निघालेल्या आस्था स्पेशल ट्रेनमध्ये ६ फेब्रुवारी रोजी रात्री ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : श्रीरामलल्लांच्या दर्शनासाठी पुणे येथून अयोध्येकडे निघालेल्या आस्था स्पेशल ट्रेनमध्ये ६ फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कुणीतरी अज्ञात इसमाने जळता मोबाइल ट्रेनच्या खिडकीतून आत फेकल्याने एक महिला प्रवासी जखमी झाली आहे. या घटनेने रेल्वे प्रवाशांत खळबळ माजली आहे. ही घटना चिंचवड ते देहू रोड रेल्वे स्टेशनदरम्यान घडली असून आस्था स्पेशल पनवेल रेल्वेस्थानकात आल्यानंतर रेल्वे पोलिसांनी मदतकार्य करून त्या जळत्या मोबाइलसह इतर सामान जप्त केले आहे.
पनवेल स्थानकात कडेकोट बंदोबस्त
पनवेल रेल्वे पोलिस आणि पनवेल शहर पोलिसांनी ट्रेन पनवेल स्थानकात आली तेव्हा कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. या घटनेबाबत रेल्वे पोलिस दलातील हेड काॅन्स्टेबल संदीप नंदकुमार माने यांनी जखमी महिला प्रवाशासह इतरांचे जबाब घेऊन हा गुन्हा पुणे रेल्वे पोलिसांकडे वर्ग केला आहे.
यामुळे ही गाडी रात्री १०:२२ वाजता पनवेल स्थानकात आली असता रेल्वे पोलिसांनी त्वरित मदतकार्य राबवून त्या जळत्या मोबाइलसह इतर संशयास्पद वस्तू ताब्यात घेऊन जप्त केल्या आहेत.