सीबीडीत किआॅक्ससमोरील सार्वजनिक जागेचा गैरवापर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 11:23 PM2018-10-23T23:23:18+5:302018-10-23T23:23:25+5:30

सीबीडी सेक्टर-११ मध्ये महापालिकेने बांधलेल्या किआॅक्स समोरील सार्वजनिक जागेचा गैरवापर होत असून, या जागेवर बेकायदेशीरपणे फेरीवाल्यांनी आपले बस्तान मांडले आहे.

Abuse of public space in the CBD against Qaeda | सीबीडीत किआॅक्ससमोरील सार्वजनिक जागेचा गैरवापर

सीबीडीत किआॅक्ससमोरील सार्वजनिक जागेचा गैरवापर

Next

नवी मुंबई : सीबीडी सेक्टर-११ मध्ये महापालिकेने बांधलेल्या किआॅक्स समोरील सार्वजनिक जागेचा गैरवापर होत असून, या जागेवर बेकायदेशीरपणे फेरीवाल्यांनी आपले बस्तान मांडले आहे. काही किआॅक्समध्ये व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी या किआॅक्ससमोरील मोकळ्या जागेवर टेबल-खुर्च्या थाटून ओपन हॉटेल्स सुरू केली आहेत. पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांना ये-जा करताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सीबीडी सेक्टर ११ येथे नागरिकांना सुविधा देण्याच्या दृष्टीने ४६ किआॅक्स बनविण्यात आले आहेत. या भागात विविध खासगी आणि शासकीय कार्यालये, आयटी कंपन्या आदी असल्याने किआॅक्समधील खाद्यपदार्थांचे व्यवसाय तेजीत सुरू आहेत; परंतु व्यावसायिकांनी किआॅक्सच्या बाहेरील सार्वजनिक जागेवर टेबल-खुर्च्या थाटून ओपन हॉटेल्स सुरू केली आहेत. अनेक व्यावसायिकांनी किआॅक्सच्या बाहेरील जागेवर पाणीपुरी, ज्यूस सेंटर, फ्रुट सलाड, वडापाव यांसारखे खाद्यपदार्थ विक्री करणाºया व्यावसायिकांना जागा भाड्याने दिल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी येणाºया नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. किआॅक्ससाठी देण्यात आलेल्या पाण्याचाही गैरवापर होत असून, सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था झाली आहे.
काही ठिकाणी किआॅक्समध्ये तंबाखू, सिगारेट सारखे तंबाखूजन्य पदार्थ विक्र ी केले जात असून, पानशॉपही थाटण्यात आले आहेत. पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
>सीबीडी येथील किआॅक्स समोरील मोकळ्या जागेवर बेकायदेशीरपणे व्यवसाय करणाºया व्यावसायिकांवर बेलापूर विभागामार्फत कारवाया केल्या जात आहेत.
- दादासाहेब चाबुकस्वार,
उपायुक्त, मालमत्ता विभाग

Web Title: Abuse of public space in the CBD against Qaeda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.