ओळखपत्राशिवाय महापालिका मुख्यालयात प्रवेश बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 11:38 PM2019-12-19T23:38:45+5:302019-12-19T23:38:50+5:30
सुरक्षेच्या कारणास्तव निर्णय : बनावट ओळखपत्रावर ठेकेदारांची घुसखोरी
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालय इमारतीच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसेच कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कामकाज करता यावे यासाठी ओळखपत्राशिवाय महापालिका मुख्यालयात प्रवेश बंद करण्यात आला आहे. विविध कामांसाठी मुख्यालयात येणाºया अभ्यागतांनादेखील मुख्यालयात येण्याची वेळ ठरवून देण्यात आली आहे. परंतु काही ठेकेदार आणि कंत्राटदार बनावट ओळखपत्राच्या माध्यमातून मुख्यालयात घुसखोरी करीत आहेत. यांना रोखणे महापालिका प्रशासनासमोर आव्हान असणार आहे.
नवी मुंबई महापालिकेची मुख्यालय इमारत ही देशातील वास्तुरचनेचा नमुना मानली जाते. मुख्यालयात ये-जा करणारे नागरिक, कंत्राटदार, ठेकेदार आदींचा दिवसभर राबता असतो. तसेच मुख्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दालनातदेखील मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. पामबीच मार्गाशेजारी उभ्या असलेल्या या इमारतीच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस मुख्यालयाकडून वेळोवेळी सूचना केल्या जात आहेत. याला अनुसरून महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मुख्यालयात जाण्यासाठी प्रवेशद्वार क्रमांक १ मधूनच प्रवेश करता येणार आहे. महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाºयांना कार्यालयीन वेळेत ये-जा करताना ओळखपत्र दर्शनी भागावर प्रदर्शित करणे बंधनकारक राहणार आहे. करारपद्धतीवर तसेच ठेकेदारामार्फत नियुक्त कर्मचाºयांनादेखील दर्शनी भागात ओळखपत्र लावायचे आहे. अधिकारी, कर्मचारी यांना कार्यालयीन वेळेत काम करता यावे तसेच नागरिकांना आपल्या विविध कामांसाठी मुख्यालयात प्रवेश करता यावा यासाठी दुपारी ३ ते ५ ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. मुख्यालयात कोणत्याही प्रकारच्या विक्रेत्यास अथवा व्यावसायिक दृष्टिकोनातून येणाºया एजंट यांना आमंत्रित करू नये याबाबत महापालिका अधिकारी आणि कर्मचाºयांना आयुक्तांमार्फत निर्देश देण्यात आले आहेत.
महापालिका वास्तूची सुरक्षा तसेच अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला शिस्त लावण्यासाठी पालिका आयुक्तांनी हाती घेतलेल्या या उपक्रमाच्या अंमलबजावणीला गुरुवारी १९ डिसेंबरपासून सुरुवातदेखील करण्यात आली आहे. मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर पालिका अधिकारी आणि सुरक्षारक्षकांच्या माध्यमातून ओळखपत्र तपासणी करण्यात आली. परंतु काही कंत्राटदार आणि ठेकेदार यांनी महापालिकेचे कर्मचारी असल्याचे बनावट ओळखपत्र यापूर्वीच बनवून घेतले असून मुख्यालयात प्रवेश करण्यासाठी त्याचा गैरवापर केला जात आहे.
बारकोडद्वारे उघडणारे दरवाजे बंद अवस्थेत
च्मुख्यालयातील प्रत्येक विभागात अधिकृत व्यक्तीलाच प्रवेश करता यावा यासाठी मुख्यालयाची निर्मिती करताना लाखो रुपये खर्च करून बारकोडच्या माध्यमातून दरवाजे उघडण्याची सिस्टिम बनविण्यात आली आहे.
च्महापालिका अधिकारी आणि कर्मचाºयांना देण्यात आलेल्या ओळखपत्रावर त्याप्रमाणे बारकोडदेखील देण्यात आले आहेत. परंतु या पद्धतीचा वापर केला जात नसून सिस्टिम बंद पडली आहे. तसेच दरवाजे सातत्याने उघडे राहत असल्याने कोणालाही सहज प्रवेश करता येत आहे.
अभय योजना आणि आधार कार्ड बनविण्यासाठी प्रवेश
च्नवी मुंबई शहरातील मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी महापालिकेने अभय योजना सुरू केली आहे. महापालिका मुख्यालयातील मालमत्ता कर भरणा केंद्रात कर भरण्यासाठी येणाºया नागरिकांना कागदपत्रे तपासून सोडण्यात येत असून मुख्यालयातील आधार केंद्रात येणाºया नागरिकांनादेखील सोडले जात आहे.
हेल्मेट नसणाºयांनादेखील बंदी
च्नवी मुंबई शहरात दुचाकीस्वारांच्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. दुचाकीस्वारांना हेल्मेटची सवय लागावी यासाठी पामबीच मार्गाशेजारी असलेल्या महापालिका मुख्यालयात दुचाकीने येणाºया महापालिका कर्मचारी आणि नागरिकांना हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. हेल्मेट नसेल तर वाहनांना प्रवेश देण्यात येत नसून त्याचीदेखील अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात येत आहे.