कारच्या स्टंटमुळे होताहेत अपघात

By admin | Published: March 21, 2016 02:02 AM2016-03-21T02:02:47+5:302016-03-21T02:02:47+5:30

वाशीतील मिनी सी शोर परिसरात वेगाने कार चालवल्याने अपघात होत आहेत. पर्यटनाच्या बहाण्याने त्या ठिकाणी येणारे काही उत्साही तरुण वाहनांच्या रेस लावत असल्याने हे अपघात होत आहेत

Accident due to car stunts | कारच्या स्टंटमुळे होताहेत अपघात

कारच्या स्टंटमुळे होताहेत अपघात

Next

नवी मुंबई : वाशीतील मिनी सी शोर परिसरात वेगाने कार चालवल्याने अपघात होत आहेत. पर्यटनाच्या बहाण्याने त्या ठिकाणी येणारे काही उत्साही तरुण वाहनांच्या रेस लावत असल्याने हे अपघात होत आहेत. अशाच एका प्रकारात रविवारी कारच्या अपघाताची घटना घडली.
वाशीतील मिनी सी शोर हे शहरातील पर्यटनाचे क्षेत्र म्हणून विकसित होत आहे. मात्र काही उत्साही तरुणांची गर्दी पर्यटकांना त्रासदायक ठरत आहे. शहराच्या विविध ठिकाणचे तरुण स्वत:च्या दुचाकी अथवा कार अशा वाहनांसह त्या ठिकाणी जमतात. यावेळी हौसेखातर त्यांच्यामध्ये रेस लावण्याचे प्रकार घडत आहेत.
धूम स्टाईलने पळवल्या जाणाऱ्या वाहनांमुळे ध्वनिप्रदूषणासह पादचाऱ्यांना दुखापतीची शक्यता निर्माण होत आहे. त्यामुळे यापूर्वी वाहतूक पोलिसांनी त्या ठिकाणी कारवाया देखील केलेल्या आहेत. त्यानंतरही मिनी सी शोरच्या मार्गावर वेगात वाहन पळवण्याचे प्रकार सुरूच आहेत.
रविवारी दुपारी अशाच एका प्रकारात कारचा अपघात झाला. चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने ही कार रस्त्यालगतच्या झाडीमध्ये घुसली. दुभाजक ओलांडून कार मार्गाबाहेर गेल्यामुळे कारचे नुकसान झाले आहे. मात्र अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळीच कार सोडून पळ काढला. (प्रतिनिधी)

Web Title: Accident due to car stunts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.