रखडलेल्या कामामुळे अपघात

By admin | Published: January 10, 2017 06:54 AM2017-01-10T06:54:13+5:302017-01-10T06:54:13+5:30

सायन पनवेल महामार्गावरील कामोठे पुलाचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे.

Accident due to stuck work | रखडलेल्या कामामुळे अपघात

रखडलेल्या कामामुळे अपघात

Next

वैभव गायकर / पनवेल
सायन पनवेल महामार्गावरील कामोठे पुलाचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे. यामुळे कामोठेती रहिवाशांना सुमारे दीड किलोमीटरपेक्षा जास्त वळसा घालून वसाहतीत यावे लागते. सीआरझेडच्या परवानगी न मिळाल्याने येथील रस्त्याचे काम रखडल्याचे बोलले जात आहे. रखडलेल्या कामांमुळे याठिकाणी अनेक अपघात होत आहेत. बुधवारी सकाळी डालड्याचे डब्बे वाहून नेणाऱ्या टॅकरला याठिकाणी अपघात झाला.
महामार्गावर प्रवेश करताना अनेक चालक उलट्या दिशेने वाहन चालवून महामार्गावर प्रवेश करतात. मुंबईकडे जाणारी वाहने याच मार्गावरून वेगाने जात असून याचठिकाणी बस स्थानक व अनेक गाड्याचा थांबा आहे. अनेकदा उड्डाणपुलावर चढतानाही वाहनांचे अपघात होतात.
सीआरझेडच्या कचाट्यात अडकलेले हे रस्त्याचं काम  सुरु करण्यासाठी कामोठेवासियांनी सह्यांची मोहीम राबविली. मोर्चा काढण्याचाही निर्धार केला मात्र अद्याप रस्त्याचे काम अपूर्णच राहिले आहे.  पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी  देखील यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकाऱ्यांशी वारंवार बैठका घेऊन रस्त्याचे
काम सुरु करण्याचे प्रयत्न केले  मात्र संबंधित खात्याकडून दुर्लक्ष होत असल्याने अद्याप हा रस्त्याचे काम सुरु झालेले नाही.

Web Title: Accident due to stuck work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.