मुंबई-गोवा महामार्गावर अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2016 02:16 AM2016-05-12T02:16:09+5:302016-05-12T02:16:09+5:30

मुंबई-गोवा महामार्गावर मंगळवारी रात्री ७.४५ वाजण्याच्या सुमारास महाड तालुक्यातील रायगड विभागामधील पाणे गावाहून सुरतला जाणाऱ्या एका खासगी बसची वहूरजवळ पुढे

Accident on Mumbai-Goa highway | मुंबई-गोवा महामार्गावर अपघात

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात

Next

दासगांव : मुंबई-गोवा महामार्गावर मंगळवारी रात्री ७.४५ वाजण्याच्या सुमारास महाड तालुक्यातील रायगड विभागामधील पाणे गावाहून सुरतला जाणाऱ्या एका खासगी बसची वहूरजवळ पुढे जाणाऱ्या एका ट्रकला मागून धडक बसली. या अपघातात बसमधील सात प्रवासी जखमी झाले.
लग्नासाठी आलेले गुजरातमधील सुरत येथे राहणारे हे चाकरमानी लग्नकार्य आटोपून महाड तालुक्यातील रायगड विभागातील पाणे या गावातून पुन्हा सुरतकडे जात असताना तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावर वहूर गावच्या हद्दीत मंगळवारी रात्री ७.४५ च्या सुमारास वाहतूककोंडी झाली होती. यावेळी पुढे चालत असलेल्या ट्रकला (क्र. बीआर ०१ जीई ४६०७) खासगी बस (क्र. जीजे ०५-५५५१) च्या चालकाचा ताबा सुटून मागून धडक बसली. या बसमधील शुभांगी सांगले (२८), प्रकाश शेलार (४३), नैसी शेलार (९), गीता शेलार सर्व राहणार सुरत, सुरेश उत्तेकर (३५, रा. वाळण, महाड), माया उत्तेकर (वाळण), संगीता देवगोरकर (३५) हे सात प्रवासी जखमी झाले. सर्व जखमींवर दासगांव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. पुढील तपास महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एम. बी. पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एस. बी. पवार करीत आहेत. (वार्ताहर)दुचाकी घसरून अपघातात एक ठार
च्महाड : मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेला तरुण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. हा अपघात बुधवारी दुपारी २ वा. च्या सुमारास मोहोप्रे फाट्याजवळ गांधारी पुलाजवळ घडला. विकी शिंदे (२६, रा. गांधारपाले) हा तरुण अपघातात जागीच ठार झाला तर सचिन पिंगळे हा जखमी झाला, त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सचिन पिंगळे हा विक ीसोबत जात असताना दुचाकीवरील त्याचे नियंत्रण सुटून दुचाकी घसरली. शहर पोलीस ठाण्यात या अपघात प्रकरणी नोंद आहे.

Web Title: Accident on Mumbai-Goa highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.