मुरुड : तालुक्यात पर्यटकांची सर्वाधिक गर्दी काशिद बीचवर होते, तसेच बीचवर शेकडो वाहनांची वर्दळ असते. काशिद बीचजवळील तलवारवाडी वळणावर कठडे नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. ३ जानेवारीला संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास वळणावर स्विफ्ट डिझायर (एमएच ५ सीए ३७८४) चालकाचा वळणावर ताबा सुटल्याने वेगावर नियंत्रण नसल्याने गाडीला अपघात झाला. गाडीचा वेग जास्त असल्यामुळे एका फलकावर आदळून गाडी थांबली. दैव बलवत्तर म्हणून खड्ड्यात पडलेल्या गाडीतील चौघे जण थोडक्यात बचावले. घटनावृत्त समजताच पेट्रोलिंगसाठी आलेल्या पीएसआय माने यांनी धाव घेतली व चौघांना बाहेर काढले. सार्वजनिक बांधकाम खात्याने या वळणावर उंची कठडे बांधण्याची आवश्यकता येथील नागरिकांनी व्यक्त केली. यापूर्वीदेखील बरेचदा या वळणावर अपघात घडलेले आहेत.
काशिद बीचजवळ अपघात
By admin | Published: January 05, 2016 2:04 AM