पामबीच रोडवर अतिवेगामुळे अपघात, सिग्नलचा पोल उखडला : कारचालकाविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 01:48 AM2017-12-18T01:48:48+5:302017-12-18T01:48:58+5:30
पामबीच रोडवर सीबीडीकडून वाशीकडे जाणाºया मार्गिकेवर बीएमडब्ल्यू कारने आॅडीला व सिग्नलच्या पोलला धडक दिली. अपघातामध्ये सिग्नल मुळापासून उखडला. सुदैवाने यामध्ये कोणीही गंभीर जखमी झाले नाही.
नवी मुंबई : पामबीच रोडवर सीबीडीकडून वाशीकडे जाणाºया मार्गिकेवर बीएमडब्ल्यू कारने आॅडीला व सिग्नलच्या पोलला धडक दिली. अपघातामध्ये सिग्नल मुळापासून उखडला. सुदैवाने यामध्ये कोणीही गंभीर जखमी झाले नाही.
सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास टी.एस. चाणक्य चौकाजवळ हा अपघात झाला. बीएमडब्ल्यू कारचालक अतिवेगाने वाशीच्या दिशेने जात होता. त्याचा कारवरील ताबा सुटल्याने त्याची कार एमएच ०४ एफझेड २२९० या आॅडी कारला धडक देत सिग्नलच्या पोलवर जाऊन आदळली. कारच्या धडकेने सिग्लन मुळापासून उखडला. रोडच्या कडेला लावलेले अॅल्युमिनिअम पट्ट्याचे बॅरिकेट्स उखडून कार रोडच्या बाजूला झाडीमध्ये जाऊन थांबली. कारमधील अत्याधुनिक यंत्रणेमुळे कारचालकास गंभीर दुखापत झाली नाही. सिग्नलच उखडल्यामुळे पामबीच रोडवर वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती. बघ्यांची गर्दी जमल्यामुळे वाहतूककोंडीही झाली होती. अपघाताचे वृत्त समजताच एनआरआय वाहतूक शाखेच्या कर्मचाºयांनी घटनास्थळी पोहोचून रोडमध्ये असलेली दुसरी कार बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
या प्रकरणी एनआरआय पोलीस स्टेशनमध्ये अपघाताची नोंद झाली आहे. अपघातामुळे टी. एस. चाणक्य चौकातील सिग्नल यंत्रणा बंद झाली आहे. सिग्नल बंद असल्यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता वाढली असून, वाहतूक पोलीस व महापालिका प्रशासनाकडे विनाविलंब युद्धपातळीवर सिग्नल यंत्रणा पूर्ववत करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
पामबीचवर पुन्हा स्पर्धा -
प्रति तास ६० किलोमीटर वेगाने वाहने चालविता येतील अशाप्रकारे पामबीच रोडची रचना करण्यात आली आहे. परंतु या मार्गावर सरासरी ८० ते १५० च्या वेगाने वाहने चालविली जात आहे.
याशिवाय पहाटे, मध्यरात्री व रविवारी मोटारसायकलपासून कारचालक स्पर्धा लावत आहेत. स्पर्धा लावणाºया वाहनांचा वेग ताशी १५० च्याही पुढे जात असून त्यांच्यावर आवार घालण्याची मागणी केली जात आहे.