सायन-पनवेल महामार्गावर अपघात, नारळाचा ट्रक कलंडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 02:00 AM2019-08-16T02:00:39+5:302019-08-16T02:00:48+5:30

सायन - पनवेल महामार्गावर सीबीडीमध्ये पहाटे नारळाचा ट्रक कलंडला. यामुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती.

Accident on Sion-Panvel highway | सायन-पनवेल महामार्गावर अपघात, नारळाचा ट्रक कलंडला

सायन-पनवेल महामार्गावर अपघात, नारळाचा ट्रक कलंडला

Next

नवी मुंबई : सायन - पनवेल महामार्गावर सीबीडीमध्ये पहाटे नारळाचा ट्रक कलंडला. यामुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने ट्रक बाजूला केला.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दक्षिणेकडील राज्यांमधून मोठ्या प्रमाणात नारळ विक्रीसाठी येत असतात. पहाटे ५वाजता बाजार समितीकडे जाणाऱ्या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटला. सीबीडीजवळ ट्रक पलटी झाला. नारळाचे साहित्यही रोडवर पडले. यामुळे पहाटे या परिसरामध्ये वाहतूककोंडी झाली. पलटी झालेल्या ट्रकमुळे इतर वाहनांचा अपघात होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात आली.

१५ आॅगस्टमुळे महामार्गावरील वाहनांची संख्या वाढली होती. याशिवाय मंत्री व इतर व्हीआयपी व्यक्तींचा वावरही वाढला होता. या दरम्यान वाहतूककोंडी वाढू नये यासाठी पोलिसांनी विशेष काळजी घेतली होती. घटनास्थळी कर्मचारी तैनात केले हाते. क्रेनच्या साहाय्याने ट्रक बाजूला काढण्यात आला. ट्रक बाजूला काढत असताना वाहतूक काही वेळ थांबवावी लागली होती. वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र निर्माण झाले होते.

सीबीडीमधील अपघात वगळता इतर ठिकाणी वाहतूक सुरळीत होती. वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन वाशी, सानपाडा, नेरुळ व इतर ठिकाणीही पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता.

पहाटे सीबीडीमध्ये ट्रकचा अपघात झाला होता. ट्रक बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
- बाबासाहेब तुपे, पोलीस निरीक्षक,
सीबीडी वाहतूक शाखा

Web Title: Accident on Sion-Panvel highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.