...ती भेट ठरली अखेरची, मित्राच्या भेटीला आलेल्या तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू, मित्रावर अपघाताचा गुन्हा

By सूर्यकांत वाघमारे | Published: October 19, 2022 06:06 PM2022-10-19T18:06:57+5:302022-10-19T18:07:51+5:30

Accident News: मित्राच्या भेटीसाठी आलेल्या तरुणाचा परत मुंबईला जात असताना अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तीन दिवसाच्या उपचारानंतर त्याने रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

Accident: ...that meeting turned out to be the last, a young man who came to meet a friend died in a two-wheeler accident, a crime against a friend | ...ती भेट ठरली अखेरची, मित्राच्या भेटीला आलेल्या तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू, मित्रावर अपघाताचा गुन्हा

...ती भेट ठरली अखेरची, मित्राच्या भेटीला आलेल्या तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू, मित्रावर अपघाताचा गुन्हा

Next

नवी मुंबई - मित्राच्या भेटीसाठी आलेल्या तरुणाचा परत मुंबईला जात असताना अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तीन दिवसाच्या उपचारानंतर त्याने रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. याप्रकरणी दुचाकी चालवणाऱ्या मित्रावर अपघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उमेश चिंदरकर (३१) असे अपघातामध्ये मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. तो परेलच्या राहणारा असून १० ऑक्टोबरला दिवा येथे राहणाऱ्या सागर ओटवकर या मित्राला भेटण्यासाठी आला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी तो सागर याच्या मोटारसायकलवरून मुंबईच्या दिशेने येत होता. त्यांची मोटरसायकल वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली असता मोटारसायकलची एनएमएमटीला धडक बसली. यामध्ये दोघेही जखमी झाले असता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यादरम्यान उमेश याची प्रकृती चिंताजनक होती. अखेर १७ तारखेला सकाळी उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेच्या अनुशंघाने वाशी पोलिसांनी अधिक तपास केला असता, मोटरसायकल चालकाच्या चुकीने अपघात घडल्याचे समोर आले. त्यानुसार उमेशचा मित्र सागर याच्यावर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

Web Title: Accident: ...that meeting turned out to be the last, a young man who came to meet a friend died in a two-wheeler accident, a crime against a friend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.