नवी मुंबई : सायन - पनवेल महामार्गावर सीबीडी उड्डाणपुलावर बुधवारी रात्री कारला गंभीर अपघात झाला. यामध्ये सहा प्रवासी जखमी झाले. पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कादबाने ड्युटी संपवून घरी जात असताना त्यांच्या हा प्रकार निदर्शनास आला व त्यांनी जखमींना तत्काळ मदत उपलब्ध करून दिली.चालकाचा ताबा सुटल्यामुळे कार पुलाच्या कठड्याला धडकली व पलटी झाली. कारमधील फैयाज पारकर यांच्यासह सहा जण जखमी झाले. सुदैवाने मागून वाहने येत नसल्याने मोठी दुर्घटना टळली. अपघात झाल्यानंतर काही क्षणात पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कादबाने तेथून नेरूळकडे जात होते. त्यांनी तत्काळ अपघातग्रस्तांना वाहनामधून बाहेर काढण्यास मदत केली. क्रेन बोलावून अपघात झालेली कार बाजूला करून वाहतूककोंडी होणार नाही याची काळजी घेतली. खासगी वाहनांमधून जखमींना रूग्णालयात पाठविण्याची व्यवस्था केली.अधिकाºयाचे कौतुकनववर्षाच्या स्वागतासाठीच बंदोबस्त, नंतर कोरेगाव भीमा मधील घटना व राज्यव्यापी बंद यामुळे पोलीस सलग ७२ तास बंदोबस्तामध्ये व्यस्त आहेत. यानंतरही सीबीडी पुलावर झालेल्या अपघातानंतर कार्यक्षेत्रातील घटना नसतानाही पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सीबीडी उड्डाणपुलावर अपघात, सहा जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 6:51 AM