नवी मुंबई : गुन्हे शाखेने आयुक्तालय क्षेत्रामध्ये सोनसाखळी चोरी करणा-या आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून १६ गुन्हे उघडकीस आले असून २०७ ग्रॅम वजनाचे ५ लाख ५२ हजारांचे दागिने हस्तगत केले आहेत.गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाला शिळफाटा परिसरामध्ये चोरी करणारी टोळी येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा रचून अलीरजा ऊर्फ अलिबाबा शब्बीर बेग याला अटक केली आहे. त्याच्याकडून ८ सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून २ लाख ७० हजार रूपये किमतीचे दागिने हस्तगत केले आहेत. युनिट एकच्या पथकाने नौशाद अहमद सरदार अहमद कुरेशी याला अटक केली आहे. त्याच्याकडून ७ गुन्हे उघडकीस आणले असून २ लाख ६२ हजार रुपये किमतीचे दागिने हस्तगत केले आहेत.
सोनसाखळी चोरी करणाºया आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 2:22 AM